Maharashtra Politics : ठाकरे की शिंदे? खरी शिवसेना कुणाची? आज होणार सुनावणी; निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात होणाऱ्या या सुनावणीचा निकाल आज येण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray Saam Tv

Shiv sena Crisis : खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबत आज म्हणजेच १७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात होणाऱ्या या सुनावणीचा निकाल उद्याच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Maharashtra Kesari : सिकंदरविरोधात ४ गुण देणाऱ्या पंचाला धमकी; पोलिस कर्मचाऱ्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार असताना,एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत बंड केलं. यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना आमचीच आहे असा दावाही शिंदे यांनी केला. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिवसेना आमचीच आहे असा दावा केला आहे. दोन्ही नेत्यांकडून शिवसेनेसह धनुष्यबाणावर दावा करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले असून शिवसेना नेमकी कुणाची यावर निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू आहे.(Maharashtra Political News)

गेल्या सुनावणीत काय घडलं?

गेल्या सुनावणीत शिंदे गटाच्या वतीने अँड. महेश जेठमलानी आणि अँड मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली होती. त्यांनी शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती. तिच्यामध्ये बदल न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. पण त्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बेकायदेशीररित्या अध्यक्ष झाल्याचा युक्तीवाद केला होता.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Jalna News : आमदार गोरंट्याल यांचा खोतकर, झोल कुटुंबीयांवर गंभीर आरोप; थेट मोक्का लावण्याची केली मागणी

तसंच अँड मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद करताना इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरनुसार पक्ष चिन्ह कुणाचे हे ठरवावे लागेल. निवडणूक चिन्ह हे गरीब व अशिक्षित नागरिकांसाठी पक्षाची ओळख असते म्हणून अधिकृत राजकीय पक्षाला अधिकृत चिन्ह मिळते. सादिक अली केसमध्ये झालेल्या निर्णयानुसार निकाल देणे आवश्यक आहे व त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कायदा आहे. सादिक अली केसनुसार शिंदे गटाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह द्यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

ठाकरे गटाच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुनावणीच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने सुनावणी घेऊ नये. तसंच सुरु असलेल्या सुनावणीतील युक्तीवाद हा प्राथमिक युक्तीवाद आहे की अंतिम युक्तिवाद याची माहिती द्यावी. अशी विनंती निवडणूक आयोगाला केली होती.

उद्या निवडणूक आयोगासमोर काय होणार?

ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल युक्तिवाद करतील.

अँड मनिंदर आणि कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे खोडून काढतील.

दोन्ही बाजूचा युक्तीवाद उद्याच जर पूर्ण झाला तर रात्री उशिरा निवडणूक आयोग आपला निर्णय देईल. अन्यथा सुनावणीची पुढील तारीख देईल.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com