मोठी बातमी! ९२ नगरपरिषदांनंतर आता ८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.
Election
ElectionSaamTV

मुंबई: निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्यात ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांना (Election) स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर आता राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

राज्यात पावसामुळे सध्या मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील साधारण ८ हजार सहकारी सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Election
१८ जुलैपासून सुरू होणारे अधिवेशन पुढे ढकलले

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) राज्यातील जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. तसेच पावसामुळे 89 व्यक्तींचे निधन झाले आहे. राज्यातील अतिवृष्टी असल्याने 249 गावे बाधित झाले आहेत. पावसामुळे होणारे नुकसान चालू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेतला आहे.

Election
औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादच्या धाराशीव नामांतराचा निर्णय आमचंच सरकार घेईल: फडणवीस

राज्य सहकारी निवडणूक (Election) प्रानिकरणाकडून प्राप्त झालेल्या मानहतीनुसार, राज्यातील निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी सांस्र्थांची संख्या ३२,७४३ पैकी निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या ७६२० इतक्या सहकारी सांस्र्था आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या संस्थांपैकी सुरू असणाऱ्या सहकारी संस्था ५६३६ इतक्या असून, नामनिर्देशन सुरू न झालेल्या सहकारी संस्था १९८४ इतक्या आहेत. बहुतांश सहकारी संस्था या ग्रामीण भागात असून त्यांची सदस्य संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com