Elections 2022: मुंबईत प्रभाग वाढणार... पण कुठे? पालिकेचं ठरलंय!

Elections 2022: राज्य शासनाने प्रभाग वाढीचा निर्णय घेतल्यामुळे तब्बल २० वर्षांनी ही प्रभाग वाढ होणार आहे. यापूर्वी २००२ मध्ये प्रभाग संख्या वाढवण्यात आली होती.
Elections 2022: मुंबईत प्रभाग वाढणार... पण कुठे? पालिकेचं ठरलंय!
Elections 2022: मुंबईत प्रभाग वाढणार... पण कुठे? पालिकेचं ठरलंय!Saam Tv

मुंबई: मुंबईत दररोज देशभरातून नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त येतात आणि हळू-हळू कायम स्वरूपी मुंबईकर होऊन जातात, त्यामुळे मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. हीच वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि मुंबई पालिकेच्या निवडणूका फेब्रुवारीत होणार असल्यामुळे पालिकेने निवडणुकीची तयारी करताना २७ प्रभागांच्या सुधारित सीमांकनाचा मसुदा राज्याच्या निवडणूक आयोगाला ऑक्टोबरमध्ये सादर केला होता. त्यावर राज्य सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. २२७ प्रभागांमध्ये ९ जागांनी वाढ करून २३६ प्रभाग करण्याचा शासनाने निर्णय घेतलाय. (Elections 2022: Ward will increase in Mumbai ... but where? The state government has decided!)

हे देखील पहा -

पण या वाढणाऱ्या ९ जागा मुंबई शहरात वाढणार नसून, उपनगरांमध्ये वाढणार आहेत. कारण मुंबई शहराची लोकसंख्या वाढली नसून उपनगरांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर वाढलीय. त्यामुळं मुंबई शहर वगळता मुंबईच्या पश्चिम उपनगरात ५ तर पूर्व उपनगरात ४ जागा वाढवल्या जाणार आहेत. यातील पश्चिम उपनगरात - अंधेरी पश्चिम, गोरेगाव पश्चिम, मालाड पश्चिम, कांदिवली विभाग, बोरिवली - दहिसर विभागात प्रभाग वाढणार आहेत. तर पूर्व उपनगरात पवई, विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड, भांडुप-मुलुंड पश्चिम भाग, विक्रोळी-कांजुरमार्ग पूर्व, नाहूर, भांडुप पश्चिम भागातील प्रभाग वाढणार आहेत .

सध्या मुंबई शहर विभागात ५६ नगरसेवक आहेत, जिथे कोणताही बदल होणार नाही. पूर्व उपनगरात मात्र ६९ नगरसेवक असून तिथे ४ नगरसेवक वाढवले जाणार आहेत, त्यामुळे तिथली संख्या ७३ होणार आहे. तर पश्चिम उपनरात १०२ नगरसेवक असून ५ ने वाढल्यास १०७ इतकी संख्या होणार आहे. त्यामुळे एकुण प्रभागांची संख्या आता २३६ होणार आहे.

Elections 2022: मुंबईत प्रभाग वाढणार... पण कुठे? पालिकेचं ठरलंय!
Covid Booster Dose: कोरोना लसीचा मुंबईकरांना घ्यावा लागेल तिसरा डोस?

राज्य शासनाने प्रभाग वाढीचा निर्णय घेतल्यामुळे तब्बल २० वर्षांनी ही प्रभाग वाढ होणार आहे. २००२ मध्ये यापूर्वी संख्या वाढवण्यात आली होती. १८७२ मध्ये मुंबई महापालिकेत ६४ नगरसेवकांची संख्या होती, ती १९६३ मध्ये वाढून १४० वर वाढवण्यात आली होती. १९८२ मध्ये त्यात पुन्हा वाढ करून १७० करण्यात आली होती. तर लगेचच १० वर्षांनी म्हणजेच १९९२ मध्ये त्यात तब्बल ५१ नगरसेवकांची वाढ करण्यात आली होती, त्यामुळे ही संख्या २२१ इतकी झाली होती. पुढे २००२ मध्ये ही संख्या २२७ वर गेली पण नंतर १९ वर्षात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र वाढत्या लोकसंख्यामुळे यंदा ९ नगरसेवकांची संख्या वाढवल्यामुळे मुंबईत आता एकुण २३६ इतकी नगरसेवक संख्या होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com