मावळमधील अकराशे महिला कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी रवाना, दिव्यांग महिलांचाही समावेश

मावळ मधून सुमारे अकराशे महिला कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी रवाना झाल्या आहेत. विशेष म्हणजे यात दिव्यांग महिलांचा देखील समावेश आहे.
मावळमधील अकराशे महिला कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी रवाना, दिव्यांग महिलांचाही समावेश
मावळमधील अकराशे महिला कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी रवाना, दिव्यांग महिलांचाही समावेशदिलीप कांबळे

मावळ: मागील दीड वर्षांपासून राज्यातील सर्व मंदिरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होती. त्यामुळे नवरात्र उत्सवात महिलांना देखील दर्शन मिळाले नव्हते. मात्र आता राज्यातील सर्व मंदिरे खुली झाले आहेत. त्यामुळे आता नवरात्रीचं औचित्य साधत मावळ मधील तळेगाव दाभाडे येथील सुमारे अकराशे महिला या आज सकाळी सात वाजता कोल्हापूरच्या आंबाबाई दर्शनासाठी रवाना झाल्या आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान या मध्ये एक बस ही दिव्यांग महिलांची देखील आहे. दिव्यांग महिलांना लांब प्रवास करण्यासाठी जाणे गैरसोयीचे असते, त्यामुळे आज तळेगाव येथून खास दिव्यांग महिलांसाठी एक बस कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी रवाना झाल्या आहेत. दरम्यान कोरोनाचे सर्व नियम पाळत गाडीमध्ये सॅनिटायझरची बाटली महिलांना खास मास्कची व्यवस्था गाडी मध्येच केली आहे. ''यात कुठलाही राजकीय स्टंटबाजी नाही. आम्ही दरवर्षी अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापूरला जात असतो. मात्र आतापर्यंत थोड्याच महिला घेऊन जात होतो यावर्षी अकराशे महिलांना अंबाबाईचे दर्शन महिलांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतः दिसत आहे, असं मत आयोजक संतोष भेगडे यांनी व्यक्त केलंय.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.