एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच मनसुख हिरेन हत्येतील मुख्य आरोपी- NIA

एनआयएकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच मनसुख हिरेन हत्येतील मुख्य आरोपी- NIA
Pradeep SharmaSaam TV

मुंबई: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन यांच्या हत्येतील (Mansukh Hiren Murder Case) मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर (Hight Court) प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की, कथित कट मुंबई पोलीस आयुक्तांच्या इमारतीत रचण्यात आला होता, जिथे प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते. सचिन वाझेने (Sachin Waze) मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा यांना 45 लाख दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर एनआयएने (NIA Affidavit) प्रतिज्ञापत्रत दाखल केले होते त्यात ही माहिती समोर आली आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 17 जुलै रोजी ठेवली आहे.

Pradeep Sharma
'राज ठाकरे सेक्युलर जननायक', हिंदू महासंघाची बोचरी टीका; पाहा Video

दरम्यान महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात सांगितले होते की, परमबीर सिंग हेच मनसुख हिरेन आणि अँटिलीया बॉम्ब प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत. परमबीर सिंग यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली असून अनेक गोष्टी लपवल्या असल्याचाही आरोप देशमुखांनी केला होता. परमबीर सिंग यांना विधानभवन आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावले त्यावेळी परमबीर यांनी योग्य माहिती दिली नसल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले होते.

हे सर्व पाहता मुख्यमंत्र्यांनी आणि मी गृहमंत्री असताना लगेचच परमबीर सिंग यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेऊन त्यांना डीजी होमगार्डकडे पाठवले. अनिल देशमुख म्हणाले होते की, परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, चुकीचे आहेत. अनिल देशमुख यांनी ईडीला सांगितले की, सचिन वाझे हे परमबीर सिंहांच्या जवळचे अधिकारी होते. परमबीर सिंग हे वसुलीचे काम सचिन वाझे यांना देत असत.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला होता. त्यानंतर या हत्या प्रकरणातील संशयितांची चौकशी करण्यात आली होती. आता एनआयएने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आरोपी म्हणून जेलमध्ये असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. आता उच्च न्यायालयातील पुढील सुनावणीवेळी न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.