विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीत; उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

'राज्यात सर्व पुस्तके मराठीमध्ये करणार असून आता इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक'ची पुस्तके देखील मराठीत उपलब्ध होणार'
Chandrakant Patil
Chandrakant PatilSaam TV

प्राची कुलकर्णी -

पुणे: ३१ डिसेंबरपर्यंत सर्व पुस्तकं मराठीमध्ये करणार, तसंच इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक'ची पुस्तके देखील मराठीमध्ये करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आज पुण्यात दिली. ते आज सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमात बोलत होते. (Engineering and Polytechnic)

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, राज्यात सर्व पुस्तके मराठीमध्ये करणार असून आता इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक'ची पुस्तके देखील मराठीत उपलब्ध होणार आहेत. शिवाय NSS मधील मुलांची संख्या देखील ५ लाखांपर्यंत नेणार असल्याचं पाटील यांनी सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमात सांगितलं.

पाहा व्हिडीओ -

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार दिले जाणार आहेत. यावेळी साम टीव्ही चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी तसेच पुणे सकाळचे निवासी संपादक सम्राट फडणीस हे पाटील आणि केसरकर यांच्याशी संवाद साधत होते यावेळी पाटील यांनी ही महत्वाची माहिती सांगितली.

Chandrakant Patil
'दोन वर्षात राज्याला गुजरातच्या...'; वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून फडणवीसांची विरोधकांवर टीका

सकाळ माध्यम समूहाला ९० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांचा सन्मान केला जात आहे. यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या AiSSMS, भारती विद्यापीठ, सिंहगड संस्था, progressive एज्युकेशन संस्था अशा वेगवेगळ्या 17 संस्थांचा सन्मान केला जात आहे. या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक मुउद्यांचा देखील उहापोह केला जातो आहे.

याच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी राज्यातील अभ्यासक्रमामध्ये मराठीला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं.

शिवाय येत्या जूनपासून कॉलेजमध्ये कॉम्बो विषय द्यावे, जेणेकरुन विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, विज्ञानचे दोन-दोन विषय घेता येतील असं नियोजन देखील सुरू आहे. तसंच सध्या भाषेची खूप अडचण आहे, त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत करणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com