मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

ममता पटेल असे या महिलेचे नाव असून ही मूळची गुजरात राज्यातील नवसारी येथे राहणारी होती.
मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ
मृत ममता पटेलचेतन इंगळे

वसई /विरार: नालासोपारा (Nalasopara) येथून बेपत्ता झालेल्या ३० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह पाच दिवसांनी वसईच्या किल्लाबंदर समुद्रकिनारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृत्यू समुद्रात बुडून झाल्याने पोलिसांनी सांगितले आहे. कुटुंबियांनी मात्र याप्रकरणी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांकडे तक्रार देऊनही त्यांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे.

ममता पटेल असे या महिलेचे नाव असून ही मूळची गुजरात राज्यातील नवसारी येथे राहणारी होती. दोन महिन्यापूर्वी तिचा विवाह नालासोपारा पुर्वेच्या एव्हरशाईन नगर येथे राहणाऱ्या मेहुल पटेल या तरुणाशी झाला होता.

बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजता ‘मॉर्निंग वॉक’ साठी ती बाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतली नव्हती. या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिचा शोध सुरू असताना रविवारी संध्याकाळी तीचा मृतदेह वसई पश्चिमेच्या किल्लाबंदर समुद्रकिनारी आढळून आला.

मृत ममता पटेल
शरीरसुखाच्या मागणीला विरोध; महिलेसह कुटुंबियांना मारहाण

मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्यामूळे तीचा मृत्यूला दोन ते तीन दिवस उलटून गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रथमदर्शनी सदर मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याने वसई पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com