मी फरार नाही; सोमय्यांनी 'आव्हाडांचे वाझे' म्हणून आरोप केलेल्या प्रवीण कलमेंचा खुलासा

किरीट सोमय्या यांनी सरकारी कार्यालयातून कागदपत्रे चोरल्या प्रकरणी ज्यांच्यावर आरोप केले होते त्या प्रवीण कलमे यांनी साम टीव्हीशी बोलताना सगळे आरोप फेटाळून लावले.
Jitendra Awhad-Kirit Somaiya
Jitendra Awhad-Kirit Somaiya- Saam TV

मुंबई : भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सरकारी कार्यालयातून कागदपत्रे चोरल्या प्रकरणी ज्यांच्यावर आरोप केले होते. त्या प्रवीण कलमे यांनी साम टीव्हीशी बोलताना सगळे आरोप फेटाळून लावले. तसंच आपण किरिट सोमय्यांवरती मानहानीचा गुन्हा दाखल केला असल्याचं म्हणाले आहेत.

'जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे वाझे अर्थात प्रवीण कलमे यांने माझ्या विरोधात अनेक तक्रारी केल्या. ते आता प्रवीण कलमे कुठे आहे? याचं उत्तरं मुख्यमंत्री देणार का? कलमे यांच्यावर गुन्हा दाखल आहे पोलीस त्यांना शोधत असताना ते गायब आहेत SRA च्या अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे. आता प्रवीण कलमे (Pravin Kalame) हे परदेशात पळाले आहेत का ? त्यांना कोणी मदत केली? असे अनेक प्रश्न किरीट सोमय्या (Kirit Somaiya) त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले होते. शिवाय कलमे याना फरार घोषीत करा अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

Jitendra Awhad-Kirit Somaiya
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ; कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल

त्यांच्या या आरोपांवरती खुद्द प्रवीण कलमे यांनी उत्तर दिलं आहे. मी माझ्या कामानिमित्त सतत बाहेर फिरत असतो. मात्र, जी व्यक्ती स्वत: फरार होती ती मला फरार घोषीत करत आहे हे विशेष असल्याचं कलमे म्हणाले. तसंच किरीट सोमय्यांसारख्या आरोपीकडून माझ्यावर आरोप केले हेच हस्यास्पद असून, सोमय्या यांनी ३० मार्च २०२१ रोजी मी गृहनिर्माण मंत्रालयाचा वाझे असल्याचा आरोप केला होता. माझ्यावर केलेल्या या आरोपाबद्दल मी त्यांच्या विरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल केला असून ५०० कलमाअंतर्गत चौकशी सुरु असल्याचं ते म्हणाले.

तसंच मी मेल आणि फोनवर उपलब्ध आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं माझ्या आधी त्यांना कसं कळालं त्यांना कशी समजली माझ्यावर FIR झाल्याचा मला, पोलिसांकडून समजलं नाही. तसंच आरोपी माणसाने माझ्यावर आरोप करणं हास्यास्पद, असल्याचं आहे. मला पोलिसांचा एकही फोन आला नाही, माझ्यावर केस झाल्याचे सोमय्यांच्या पत्रकार परिषदेतून समजलं असल्याचंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com