शिवराय सूर्य आहेत, त्यांची कुणाशी तुलना होऊ शकत नाही; चौफेर टीकेनंतर मंगलप्रभात लोढा यांचं स्पष्टीकरण

राजकीय स्वार्थासाठी त्यांचा वापर करणे चुकीचे आहे. कृपया यावर कुणी राजकारण करू नये.
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat LodhaSaam TV

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाषणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्या आग्र्याच्या सुटकेच्या घटनेशी केली. त्यानंतर त्यांच्यावर विरोधक अक्षरश: तुटून पडले. चौफेर टिकेची झोड उठल्यांनतर मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांसमोर येत म्हटलं की, आपण शिवरायांची कुणाशी तुलना केली नाही, तर फक्त उदाहरण दिलं.

माझं वक्तव्य कुणी पाहिले की नाही माहित नाही. मी शिवाजी महाराज यांची कुणाशी तुलना केली नाही. मी फक्त उदाहरण दिले होते. शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. शिवाजी महाराज सूर्य आहेत. हा राजकारणाच विषय नाही, असं मंगलप्रभात यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

Mangal Prabhat Lodha
शिवराय आग्र्याहून सुटले, तसे शिंदेही सुटले; महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या वक्तव्यामुळं नवा वाद

सध्या सुरु असलेलं राजकारण झालं नाही पाहिजे. राजकीय स्वार्थासाठी त्यांचा वापर करणे चुकीचे आहे. कृपया यावर कुणी राजकारण करू नये. मी कधीच असं राजकारण करत नाही. मला माझ्या विभागात काम करायचं आहे.राज्यात अनेक समस्या आहेत लोकांसाठी चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे. मला काम करू द्या, असं आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.

Mangal Prabhat Lodha
...तर CM एकनाथ शिंदेंनी किल्ले शिवनेरीवर येऊ नये; अमोल कोल्हे संतापले

मंगप्रभात लोढा नेमके काय म्हणाले?

प्रतापगडावर शिवप्रतापदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थितांना संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगाजेबाने पकडून आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा बंदिस्त केलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वत: साठी नाही, तर हिंदवी स्वराज्यासाठी युक्ती काढत सुटका करून घेतली. त्यामुळेच भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

असाच प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा झाला. पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचं सरकार स्थापन झालं, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com