...तर सर्वधर्मीयांना भोंग्याचा आदेश लागू होईल; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे. तसाच केंद्र सरकारने आदेश काढला पाहिजे.
...तर सर्वधर्मीयांना भोंग्याचा आदेश लागू होईल; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
Uddhav ThackeraySaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जो निकाल दिला आहे. तसाच केंद्र सरकारने आदेश काढला पाहिजे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नीट वाचला, तर तो सर्वधर्मीयांन लागू होते हे ध्यानात येईल त्यामुळे न्यायालयाचा आदेश आपल्या सर्व धर्मीयांना ते पाळावा लागेल असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज एका वृत्तपत्र आयोजित वेब-उपक्रमाच्या समारोप सत्रात केलं.

सरकार उत्तम चालू आहे. पवारसाहेब (Sharad Pawar) म्हणजे वडीलधाऱ्या प्रमाणे येतात मुद्देसूद बोलतात, तिघेही मिळून एकत्र काम करतो हेच सूत्र आहे. काहीच मिळत नाही तर बदनामी करा असं विरोधकांच काम सुरु असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. तसंच सरकारमधील तसंच सहकारी पक्षांमधील आमदार नाराज नव्हते, काही काम सुरुवातीच्या का रखडली निधी आणायचं कुठून? ही चर्चा सर्व पक्षी होती. असं स्पष्टीकरण त्यांनी काही दिवसांपुर्वी आमदार नाराज असलेल्या प्रकरणावरती दिलं.

हे देखील पाहा -

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या भोंग्याच्या विषयावरती देखील भोष्य केलं. ते म्हणाले, मला तरी भोंग्याचा मुद्दा हा गाजलेला वाटत नाही. भोंग्याचा विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा संपुर्ण देशासाठी आहे. गृहमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये देखील जसा नोटाबंदीचा निर्णय देशभर केला जसा लॉकडाउन देशभर केला मग भोंगाबंदी देखील देशभर करा. कारण, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे. तसाच केंद्र सरकारने आदेश काढला पाहिजे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व्यवस्थितपणे वाचला, तर तो सर्वधर्मीयांन लागू होते हे ध्यानात येईल तसंच त्यामुळे मग न्यायालयाचा आदेश आपल्या सर्व धर्मीयांना ते पाळावा लागेल अस मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केल..

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.