मोठी बातमी! पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू; पोलीस सतर्क, सर्व ट्रेन्स थांबवल्या

पुण्याकडे येणाऱ्या सर्व ट्रेन थांबवल्या
मोठी बातमी! पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू; पोलीस सतर्क, सर्व ट्रेन्स थांबवल्या
Pune Railway Station Latest News, Pune Latest Marathi News, Pune Breaking NewsSaam Tv

प्राची कुलकर्णी

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एक आज्ञात व्यक्तीने बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर वाहतूक थांबवण्यात आली आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले असून सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आला आहे. (Pune Railway Station Latest News)

तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व ट्रेन थांबविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना स्टेशन परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे. पुणे स्टेशन वर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी करण्यात येत आहे.

हे देखील पाहा -

संबंधित वस्तू रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या मैदानात नेण्यात आली आहे. बॉम्ब डिफ्युज करणाऱ्या पथकाने तत्काळ कार्यवाही करायला सुरुवात केली आहे. ही वस्तू नेमकी इथे कशी आली आणि कोणी आणली या संदर्भात तपास सुरु आहे. अद्याप या वस्तूची स्पष्टता होऊ शकलेली नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशन परिसरात उपस्थित असलेल्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

बिडीडीएसने तत्काळ या कांड्या अतिशय काळजीपूर्वक ताब्यात घेऊन त्या निकामी करण्यासाठी बी. जे.वैद्यकीय महाविद्यायाच्या मैदानात नेल्या आहेत. तेथे या कांड्या निकामी करण्याचे काम सुरू आहे.

Pune Railway Station Latest News, Pune Latest Marathi News, Pune Breaking News
तुम्ही दोनदा पंतप्रधान झालात, अजून काय हवंय?; नरेंद्र मोदींनी दिलं भन्नाट उत्तर

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुणे कंट्रोल रूमला एक निनावी कॉल आला होता, ज्यात पुणे रेल्वे स्टेशन परिसर बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. इतकेच नाही तर बॉम्ब कुठे ठेवला आहे, याची माहिती हवी असल्यास तर सात कोटी रुपये द्या, अशी मागणी देखील या आरोपींकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. या फोन कॉलने एकच खळबळ उडवली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता तो फेक कॉल असल्याचं समोर आलं होतं. धमकावणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज पुणे रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढळली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.