फडणवीसांनी शेकडो कोटी दिले, मग इंदू मिलचं काम का थांबवले?- पडळकर

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे मावळातील कामशेतमध्ये बोलत होते.
फडणवीसांनी शेकडो कोटी दिले, मग इंदू मिलचं काम का थांबवले?- पडळकर
Gopichand PadalkarSaam TV

पुणे: बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा गेले पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या कळपात घुसला आहे. मी पुरोगामी आहे, मी या जातीचं कल्याण करतो त्या जातीच कल्याण करतो हा बुरखा घातलेला लांडगा बहुजनांच्या मुलांना आता माहिती झालं आहे अशा टोला नाव न घेता शरद पवार (Sharad Pawar) यांना आमदार गोपिचंद पाडळकर यांनी टोला लगावला आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे मावळातील कामशेतमध्ये बोलत होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आणि भाजप (BJP) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, रवींद्र भेगडे, उपस्थित होते.

देवेंद फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी शेकडो कोटी दिले जागा ताब्यात घेतली. मग काम का बंद ठेवले असा सवाल पाडळकर यांनी आघाडी सरकारला विचारला आहे. कोणी चळवळी फोडल्या, बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष कोणी फोडला, धनगर समाजाची लढाई 1990 साली चांद्या पासून ते बांद्या पर्यंत बी के गोकरे यांची चळवळ कोणी फोडली हे सर्व बहुजन च्या लोकांना आता माहिती झालं आहे असेही पडळकर म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.