Pune Google Office Gets Threat Call: पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी; पोलीस यंत्रणा सतर्क

Google's Pune Office Gets Threat Call: पुण्यात बॉम्ब ठेवल्याचा असल्याचा खोटा कॉल आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये बॉम्ब असल्याचा खोटा कॉल आला होता.
Pune Google Office
Pune Google OfficeSaam tv

सचिन जाधव

Pune News : पुण्यातील कोरेगाव पार्कात(Koregaon Park) बॉम्ब ठेवण्यात आल्याचा खोटा कॉल आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील गुगल ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचा खोटा कॉल आला होता. या खोट्या कॉलमुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. खोटा कॉल आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये हे गुगलचे ऑफिस आहे. कोरेगाव पार्क येथील पूनावाला बिल्डिंगमध्ये हे गुगलचे ऑफिस आहे.

Pune Google Office
Kirit Somaiya : कोविड काळातील कमाईचा हिशोब द्या; किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सुजित पाटकरांना केला सवाल

मुंबईतील गुगल ऑफिस (Mumbai Google Office) मध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ, असा धमकीचा निनावी कॉल करण्यात आला होता. या खोट्या कॉलनंतर बॉम्ब शोधक पथकाकडून काल रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली.

यावेळी कुठली ही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. त्याला आता पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे .

Pune Google Office
Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला एसीबीची नोटीस; राजकीय वर्तुळात खळबळ

बॉम्ब स्फोटांच्या धमक्यांच्या दूरध्वनींच सत्र सुरूच

राज्यात बॉम्ब स्फोटांच्या धमक्यांचे सत्र सुरूच असल्याचे समोर आले आहे. काही तासांच्या अंतरात आलेल्या बॉम्ब स्फोट धमकीच्या दोन फोन कॉल नंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.

सोमवारी पहाटे मुंबई वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त, प्रविण पडवळ यांना यशवंत मने नावाच्या इसमाने सतत फोन करून मिरा भाईंदर परिसरात बॉम्ब स्फोट होणार असून पोलीस मदतीची मागणी केली. अधिक विचारणा केली असता त्या इसमाने शिवीगाळ केली. पोलिसांनी या प्रकरणी आणखी तपास सुरू केला आहे.

Pune Google Office
Mumbai Crime News : घरासाठी जागा दाखवायला आला अन् हानीट्रॅपमध्ये पूर्ण फसला; पुढे काय घडलं?

शनिवारी रात्री गुगल इंडियाच्या वांद्रे कुर्ला संकुलातील कार्यालयात धकमीचा फोन आला होता. गुगल इंडियाच्या पुणे येथील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. स्वतःच नाव पणयम बाबू शिवानंद सांगून हैदराबाद येथून बोलत असल्याचे सांगितले होते. कंपनीच्या लँडलाईनवर फोन करून धमकी दिली होती.

बीकेसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी भा दं वि ५०५(१)(ब) आणि ५०६(२) कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. हैदराबादचं लोकेशन ट्रेस होताच पोलीस पथक हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com