Fake Police Officer News: क्राईम ब्रँचचा अधिकारी सांगून लोकांची करायचा फसवणूक; अखेर अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Fake Police Officer News: रस्त्यावर ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या अट्टल इराणी गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दोन पोलीस पथकाने अटक केली आहे.
Fake Police Officer News
Fake Police Officer NewsSaam tv

Pimpri-Chinchwad News: क्राइम ब्रँच पोलीस ऑफिसर असल्याची बतावणी करून रस्त्यावर ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या अट्टल इराणी गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दोन पोलीस पथकाने अटक केली आहे. आबालू जाफर इराणी असं या अट्टल इराणी गुन्हेगाराचे नाव आहे. (Latest Marathi News)

आबालू जाफर इराणी हा पुण्यातील शिवाजीनगर येथील इराणी वस्तीचा रहिवासी आहे. त्याने चाकण आणि भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत स्वतः क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी असल्याचे बतावणी करून दोन जणांना मोठा आर्थिक गंडा घातला आहे.

Fake Police Officer News
Kalyan Crime News: कामावरून काढून टाकले तेथेच केली चोरी; कर्जबाजारी झालेल्या नोकराचे कृत्‍य

आबालू जाफर इराणी हा निगडी भागात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा दोन पोलिस पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत गुन्हे शाखा पोलिसांनी आबालू जाफर इराणी याला अटक केली आहे.

आबालू जाफर इराणी याने पिंपरी चिंचवड, पुणे, सातारा नाशिक, ठाणे, भाईंदर, खंडाळा आणि भोईसर या ठिकाणी जवळपास अशाच प्रकारे वीस गुन्हे केल्याचं पोलीस तपासात उघडकीस झालं आहे.

Fake Police Officer News
UP Crime News: बापरे! आंघोळीवरुन झाला वाद अन् घडलं भयंकर; लहान भावाने मोठ्या भावाला संपवलं

तसेच त्याच्या ताब्यातून चार बनावट पोलीस अधिकारी असल्याचे चार बनावट ओळखपत्र आढळून आले आहेत. त्याचबरोबर पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक महागडी स्पोर्ट बाईक असा एकूण चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com