पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटक

शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्याबरोबर सुनेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी, उद्योजकसह ८ जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटक
पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटकसागर आव्हाड

पुणे : शारीरिक Physical आणि मानसिक अत्याचार करण्याबरोबर सुनेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी, उद्योजकसह ८ जणांविरुद्ध चतुःशृंगी Chaturshrungi पोलिस Police ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाशी संबंध असल्याच्या, कारणावर एका उच्चभ्रू अध्यात्मिक गुरूला चतुःश्रृंगी पोलिसांनी शनिवारी अटक Arrested करण्यात आली आहे.

रघुनाथ राजराम येमुल (वय- ४८) रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवरी इस्टेट, बाणेर Baner असे अटक करण्यात आलेल्या गुरूजीचे नाव आहे. याप्रकरणामध्ये पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय- ३६) याच्यासह सासरच्या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली आहे.

हे देखील पहा-

रघुनाथ येमुल याने फिर्यादीचा पती गणेश गायकवाड यास फिर्यादी ही अवदसा असुन, पांढर्‍या पाय गुणांची आहे. तीची जन्मवेळ देखील चुकीची आहे, यामुळे ग्रहमान दुषीत झाल आहे. जर तुझी ही बायको म्हणुन, अशी कायम राहीली तर तु आमदार होणार नाही आणि मंत्री होणार नाहीस. यामुळे तिला लवकरच सोडचिठ्ठी दे, मी जे लिंबु देतो ते उतरविल्या नंतर तुझ्या मागची पिडी कायमची निघुन जाईल असे त्याला सांगण्यात आले आहे.

पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटक
BREAKING | खडसेंवर पुन्हा ईडीची पीडा, जावयांना अटक

यानंतर पती गणेश याने फिर्यादीवरून लिंबू ओवाळून टाकल्याचे प्रकार घडल आहे. संसार मोडण्याकरिता अनिष्ठ रूढी, परंपरा, अघोरी कृत्याचे वापर झाल्याच जबाबत फिर्यादीने नमूद केल्याने येमुल गुरूजीस अटक केली आहे. येमुल गुरूजींचे राजकीय पासून प्रशासनामधील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांशी जवळचे संबंध आहेत. यामुळे संबंधीत प्रकरणामध्ये गुरूजीला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरूजीला अटक केल्याने, त्याला ज्या पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी त्याला त्याचे भक्त भेटण्याचा प्रयत्न करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com