हॉटेलची उधारी मागणारा व्यक्ती राष्ट्रवादीचा कार्यकर्ता; सदाभाऊ खोत यांनी दिला 'हा' पुरावा

उधारीसाठी हॉटेल मालक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी चांगलीच हुज्जत घातली होती. या घटनेची राज्यात चांगलीच चर्चा सुरू झाली. या प्रकारावर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुंबईत प्रतिक्रिया दिली आहे.
Sadabhau Khot file photo
Sadabhau Khot file photo saam Tv

सुशांत सावंत

मुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असं म्हणत सांगोला येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने मंत्री सदाभाऊ खोत यांच्याबरोबर हुज्जत घातली. उधारीसाठी हॉटेल मालक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी चांगलीच हुज्जत घातली होती. या घटनेची राज्यात चांगलीच चर्चा सुरू झाली. या प्रकारावर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुंबईत प्रतिक्रिया दिली आहे.

Sadabhau Khot file photo
'आधी उधारी चुकवा, मगच जा'; हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोतांना अडवलं (पाहा Video)

सदाभाऊ खोत म्हणाले, 'दोन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर असताना अनुचित प्रकार घडला. त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असून याचा भांडाफोड मी करत आहे. हॉटेल मालक म्हणत आहे की, राष्ट्रवादीशी काही संबंध नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी लावण्यात आलेल्या एका बॅनरवर हॉटेल मालकाचा फोटो आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पत्रकावरही त्याचा फोटो आहे. निवडणुकीत मुलाच्या सांगण्यावरून जेवणावळ घातली असा आरोप केला आहे'.

Sadabhau Khot file photo
आघाडीतील अनेक आमदार नाराज, विजय आमचाच; राम शिंदेंचा दावा

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, '१७ एप्रिल रोजी मतदान झाले. तर १५ एप्रिल रोजी प्रचार संपला. निवडणूक झाल्यानंतर २५ दिवस प्रचाराचा काळ संपला असताना कसा काय जेवू घालत होता. ज्या कागदावर त्याने टिपण्णी केली त्याला ९ वर्षानंतरही घडी पडली नव्हती. बरं हे सर्व ९ वर्षानंतरच का ते बोलत आहे. त्या टप्यात आजूबाजूचेही मतदान झाले होते. आरोप करताना तारखा वेळ पाहिले नाही. निवडणुकीनंतर १५ दिवसांनंतर फोन केला,त्यावेळी मंत्री झाल्याचे ते म्हणतात. मात्र, मंत्री २०१६ साली झालो. त्यामुळे कुठेतरी माझी नाचक्की करण्यासाठी हे कृत्य त्याने केले'.

'माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी मी थांबणार नाही. मी मागेच सांगितलं मला हे सरकार अडकवण्याचा प्रयत्न करेल त्याचेच हे उदाहरण आहे. तुमचा पक्ष हा सर्वसामान्यांचा नाही, तर वाड्यातील प्रस्थापितांचा आहे. तुम्ही कितीही कोणत्याही प्रकारचे हल्ले करा आम्ही त्याला घाबरणार नाही. मी शासकीय दोऱ्यावर असताना पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून का गुन्हे दाखले केले, असा सवाल देखील सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीला केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com