PMRDA आरक्षण, रिंग रोड, रेल्वे प्रकल्प हे शेतकऱ्यांसाठी शाप - माजी राज्यमंत्री भेगडे

पुणे जिल्ह्यात पुणे रिंग रोड, पुणे-नाशिक रेल्वे, मुंबई-हैद्राबाद रेल्वे मार्ग आणि जिल्ह्यातील PMRDA च्या आरक्षणाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
PMRDA आरक्षण, रिंग रोड, रेल्वे प्रकल्प हे शेतकऱ्यांसाठी शाप - माजी राज्यमंत्री भेगडे
PMRDA आरक्षण, रिंग रोड, रेल्वे प्रकल्प हे शेतकऱ्यांसाठी शाप - माजी राज्यमंत्री भेगडेरोहिदास गाडगे

पुणे: जिल्ह्यात पुणे रिंग रोड, पुणे-नाशिक रेल्वे, मुंबई-हैद्राबाद रेल्वे मार्ग आणि जिल्ह्यातील PMRDA च्या आरक्षणाविरोधात पुणे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. विकासाच्या नावाखाली तयार केलेला PMRDA चा आराखडा शेतकऱ्यांसाठी शाप असुन असंख्य कुटुंब उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांच्या आयुष्यावर नांगर फिरवणारा हा आराखडा असल्याची घणाघाती टीका राज्याचे माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी केली आहे. (Farmers have become aggressive against the reservation of PMRDA in the pune)

हे देखील पहा -

पुणे जिल्ह्याच्या 814 गावांमध्ये जमिनींवर आरक्षण लावण्यात आलं आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, रिंग रोड आणि PMRDA च्या जमिनीवरील आरक्षणाविरोधात गावागावांतुन शेतकरी राज्य सरकारच्या विरोध आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका ओबीसी आरक्षणाचे कारण देत पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी केला आहे.

PMRDA आरक्षण, रिंग रोड, रेल्वे प्रकल्प हे शेतकऱ्यांसाठी शाप - माजी राज्यमंत्री भेगडे
रूग्णालयात हलगर्जीपणा; सलाईनमध्ये निघालं झुरळ

शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत मोठ्या संख्येने शेतकरी आज राजगुरुनगर येथील भाजप कार्यालयात जमले होते, यावेळी तुंबळ गर्दीही झाली. यावेळी अनेक कायदेतज्ञांनी बाधित शेतकऱ्यांना पुढील कायदेशीर लढाईसाठी मार्गदर्शन केलं. यावेळी माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, जि.प. सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टेपाटील, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, कायदेतज्ञ आणि अनेक शेतकरी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com