प्रॉपर्टीचा वाद! सासऱ्याने केले सुनेवर वार, घर पेटवून घेतला गळफास

प्रॉपर्टीच्या वादातून सासऱ्याने आधी सुनेच्या डोक्यात वार केले, आणि मग घर पटवून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे.
प्रॉपर्टीचा वाद! सासऱ्याने केले सुनेवर वार, घर पेटवून घेतला गळफास
प्रॉपर्टीचा वाद! सासऱ्याने केले सुनेवर वार, घर पेटवून घेतला गळफासअजय दुधाने

अजय दुधाने

अंबरनाथ : प्रॉपर्टीच्या वादातून सासऱ्याने आधी सुनेच्या डोक्यात वार केले, आणि मग घर पटवून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापुरात घडली आहे. या घटनेनं बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा-

बदलापूर पश्चिमेच्या शनि नगर परिसरातील हेरंब सृष्टी अपार्टमेंटमध्ये किसन जाधव हे मुलगा, सून, नात आणि नातू यांच्यासह वास्तव्याला आहेत. आज दुपारच्या सुमारास जाधव यांचा मुलगा कामावर गेला होता, तर मुलाची दोन्ही मुलं बाहेर गेली होती. यावेळी किसन जाधव आणि त्यांची सून असे दोघेच घरात असताना या दोघांमध्ये प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद झाले.

या वादात जाधव यांनी सुनेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. यानंतर सुनेनं आरडाओरडा केल्यानं शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली आणि सुनेला रुग्णालयात नेलं. मात्र यानाबतर किसन जाधव यांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून कपात लावलं आणि संपूर्ण घर पेटवून दिलं.

प्रॉपर्टीचा वाद! सासऱ्याने केले सुनेवर वार, घर पेटवून घेतला गळफास
मणिपूर: दहशतवाद्यांचा ग्रामस्थांवर गोळीबार; 5 जणांचा मृत्यू

यानंतर स्वतः नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जाधव यांच्या घरातून धूर निघू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलानं जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता संपूर्ण घर जळून खाक झालं होतं, तर जाधव हे अर्धमेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंरार त्यांना तातडीने इमारतीखाली आणलं असता इमारतीच्या दारातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जाधव यांच्या जखमी सुनेवर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हा प्रकार प्रॉपर्टीच्या वादातूनच घडल्याची माहिती जाधव कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. या घटनेमुळे बदलापूर शहरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.