पोटच्या मुलीवर बापाने 7 महिने केले बलात्कार; गर्भवती राहिल्याचे समजताच केले असे कृत्य

देशात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या (Womens) घटना हे वाढतच असताना ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली
पोटच्या मुलीवर बापाने 7 महिने केले बलात्कार; गर्भवती राहिल्याचे समजताच केले असे कृत्य
पोटच्या मुलीवर बापाने 7 महिने केले बलात्कार; गर्भवती राहिल्याचे समजताच केले असे कृत्य Saam Tv

ठाणे : देशात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना हे वाढतच असताना ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यामधील (Thane District) शहापूर (Shahapur) तालुक्यामध्ये एका बापाने चक्क पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाविषयी मुलीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हे देखील पहा-

आरोपीला २ मुली असून त्यात एकीचे वय १३ वर्ष आहे, तर दुसरीचे वय ६ वर्ष आहे. आरोपी आणि त्याची पत्नीचे खूप दिवसांपासून पटत नसल्यामुळे वेगळे राहत होते. आरोपी जानेवारी महिन्यांपासून मेंगाळपाडा या ठिकाणी तर त्याची पत्नी भगतपाडा या ठिकाणी राहत होती. यामुळे मोठी मुलगी पित्याबरोबर राहत होती तर लहान मुलगी आईबरोबर भगतपाडा या गावी राहत होती.

या दरम्यान आरोपी नराधम पिता मागील ७ महिन्यांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. धक्कादायक म्हणजे या अत्याचारामधून पिडीत मुलगी गर्भवती देखील राहिली होती. काही दिवसांनतर आपोआपच पिडीतेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाला आहे. आरोपीला हा प्रकार समजताच त्याने गर्भाची विल्हेवाट लावली आहे. यामुळे हे प्रकरण दबून राहिले होते.

पोटच्या मुलीवर बापाने 7 महिने केले बलात्कार; गर्भवती राहिल्याचे समजताच केले असे कृत्य
धक्कादायक! हिंगोलीच्या BSF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

आरोपीने पुरावे नष्ट करून देखील पिडीतेच्या आईला याविषयी समजले. त्यानंतर पिडीतेच्या आईने मुलीला जवळ घेऊन याविषयी विचारले. तेव्हा मुलीने घाबरलेल्या अवस्थेत झालेल्या सर्व प्रकार सांगितला आहे. मुलीच्या आईला सर्व प्रकरण समजताच तिने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर लगेच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com