Viral Video : भररस्त्यात शाळकरी मुलींमध्ये तुफान हाणामारी; एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

Girls Fight Viral Video : या व्हिडीओत दोन शाळकरी मुली एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे.
Girls Fight Viral Video
Girls Fight Viral VideoSaam TV

Pimpri-Chinchwad News: सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला भांडणाचे व्हिडीओ पाहायला मिळतात. कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही लोक एकमेकांशी भांडतात आणि नंतर त्यांच्या भांडणाचं स्वरूप मोठं होतं. ते एकमेकांना मारायलाही मागे पुढे पाहात नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Girls Fight Viral Video
Viral Video: मस्ती आली अंगाशी! चालू गाडीवरचं सुरू होता रोमान्स, पोलिसांनी घडवली अद्दल; Video Viral

या व्हिडीओत दोन शाळकरी मुली एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पिंपरी चिंचवड येथील असल्याचं सांगितलं जातंय. व्हिडीओमध्ये दोन मुली शाळेसमोरच एकमेकींना भिडल्या आहेत. त्या एकमेकींचे केस ओढून मारहाण करताना दिसत आहेत.

विशेष बाब म्हणजे, या मुली एकमेकींना मारहाण करून एकमेकींचे केस ओढत असताना आणखी एक मुलगी त्याठिकाणी येते. या मुलींचे भांडण सोडण्याऐवजी ती सुद्धा मारहाण करताना दिसून येत आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video) बनवला आहे.

दरम्यान, मुलीचं ही फ्री स्टाईल हाणामारी पाहून एका महिलेने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील ह्या मुली अगदी बेभान होऊन एकमेकींना मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com