युनियनच्या स्थापनेवरून तारापूर MIDCमधील विराज प्रोफाइल कंपनीत राडा!

कंपनीत कामगारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
युनियनच्या स्थापनेवरून तारापूर MIDCमधील विराज प्रोफाइल कंपनीत राडा!
युनियनच्या स्थापनेवरून तारापूर MIDCमधील विराज प्रोफाइल कंपनीत राडा!SaamTVnews

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील पोलाद उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या विराज प्रोफाइल कंपनीमध्ये कामगारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील काही कायम कामगारांनी कंत्राटी कामगारांना आणि पोलिसांना मारहाण केली आहे. आठ ते दहा हजार कामगार असणाऱ्या कंपनीत हा वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे.

हे देखील पाहा :

मिळालेल्या माहितीनुसार, विराज प्रोफाइल कंपनीतील एका कामगार संघटनेनं १६ मेपासून काम बंद ठेवण्याची नोटीस बजावली होती. पण, संपाच्या कालावधीत कंपनी कंत्राटी कामगारांनामार्फत काम सुरू ठेवू शकते, अशी शंका कायम कामगारांना होती. त्यामुळे संपाच्या काही दिवस आधीपासूनच कायम कामगारांनी उत्पादन बंद केलं होतं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर, पालघर प्रथमवर्ग न्यायालयाने उत्पादन बंद ठेवणाऱ्या कामगारांनी कंपनीच्या आवारापासून ५० मीटर अंतर दूर राहावं, असा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर कामगार उपायुक्त तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यात संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

युनियनच्या स्थापनेवरून तारापूर MIDCमधील विराज प्रोफाइल कंपनीत राडा!
Gyanvapi Mosque Survey: ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण पथकाचा मोठा आरोप!

दरम्यान, १०० ते १५० कायम कामगारांच्या गटाने विराज कंपनीच्या आतमध्ये प्रवेश केला. यावेळी कामगारांनी कंपनीच्या मालमत्तेचं नुकसान केल्याचं वृत्त हाती आलं आहे.यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत काही कंत्राटी कामगारासह विराज कंपनीचे अधिकारी आणि पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात येतं आहे. आठ ते दहा हजार कामगार संख्या असणाऱ्या या कंपनीतील कामगारांमधील वाद विकोपाला गेला आहे. कंपनीतील उपकरणांचं आणि व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या दालनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.