Pune: परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण; आयबी गेस्ट हाऊसमधील प्रकार

याप्रकरणी सुरक्षा बलाच्या गार्डला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
Pune: परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण; आयबी गेस्ट हाऊसमधील प्रकार
Pune: परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण; आयबी गेस्ट हाऊसमधील प्रकारSaam Tv

पुणे - शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला परिचारीकेचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune) आयबी गेस्ट हाऊसमध्ये (IB Guest House) समोर आला आहे. हे कृत्य आयबी गेस्ट हाऊसमधील (Guest House) सुरक्षा रक्षकानेच केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुरक्षा बलाच्या गार्डला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

हे देखील पहा -

अशोक चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. आयबी गेस्ट हाऊसमधील सुरक्षा रक्षकानेच हे कृत्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.३६ वर्षीय पीडित महिलेने याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कोरोना ड्यूटी करून आल्याने परिचारी आंघोळ करण्यासाठी गेल्या होत्या.

Pune: परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण; आयबी गेस्ट हाऊसमधील प्रकार
हनी ट्रॅपच्या माध्यमातून एका वकिलाची फसवणूक

मात्र त्यावेळी आयबी गेस्ट हाऊसमध्ये ड्यूटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या बाथरूमच्या खिडकीजवळ येत त्यांचे आंघोळ करतानाचे काढले फोटो आणि व्हिडिओ काढले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्या ठिकाणी सुरक्षारक्षक आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरक्षा रक्षकाला (Security guard) अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com