ST कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्यांची मंजूरी; तोडगा निघणार?

अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
ST कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्यांची मंजूरी; तोडगा निघणार?
ST कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीच्या प्रस्तावाला अर्थमंत्र्यांची मंजूरी; तोडगा निघणार?SaamTvNews

रश्मी पुराणिक

मुंबई : एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सारकरवर वर्षाला 600 कोटींचा भार येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगार वाढ देण्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांना देतील तो त्यांनी मान्य केला तर एसटी संप सुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अगोदर कर्मचाऱ्यांनी स्थानीक पातळीवर संप केला त्यांनतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझान मैदानावर धडकला. गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी मुंबईत तळ ठोकून आहेत. सरकारकडून कर्मचाऱ्यांना विविध पर्याय दिले जात आहेत, परंतु कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांसारख्या नेत्यांचा कर्मचाऱ्यांना खंबीर पाठिंबा आहे. राज्यसराकर आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु तोडगा काय निघाला नाही.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com