sakinaka area, Mumbai Fire Department
sakinaka area, Mumbai Fire Departmentsaam tv

Fire Breakout In Andheri East Building : साकीनाका परिसरातील इमारतीला आग,सुदैवाने जीवितहानी नाही

यावेळी स्थानिकांची माेठी धावाधाव झाली.

Mumbai News : मुंबईत आगीच्या दुर्घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. अंधेरी पूर्वेकडील साकीनाका परिसरात आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. (Maharashtra News)

sakinaka area, Mumbai Fire Department
Amravati Crime News : आईला त्यांनी मारलं अन् विहिरीत ढकलून दिले, खूनाचा घटनाक्रम सांगताना पाेलिसांसमाेर मुलगा ढसाढसा रडला

साकीनाका परिसरातील 90 फूट रस्त्यावरील साकी सीएचएस, डिसूझा कंपाउंड इमारतीच्या मीटर बॉक्स केबिनला आग लागली. मुंबई अग्निशमन दलाचे (Mumbai Fire Department) जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

sakinaka area, Mumbai Fire Department
RPI ला धक्का, माेठ्या नेत्याने Congress चा धरला 'हात'

ही आग लागली तेव्हा इमारतीत 40 ते 50 नागरिक अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व नागरिकांना इमारतीतून सुरक्षित बाहेर काढले. या आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या आगीत काेणीही जखमी झालेल्या नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com