Mumbai Fire : सांताक्रूझमधील एलआयसीच्या कार्यालयाला आग; आगीचं कारण अस्पष्ट

Fire breaks out in LIC office building in Santacruz : अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
Mumbai Fire : सांताक्रूझमधील एलआयसीच्या कार्यालयाला आग; आगीचं कारण अस्पष्ट
Fire breaks out in LIC office building in SantacruzTwitter/@ANI

मुंबई: सांताक्रूझ (Santacruz) परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आज सकाळी आग (Fire) लागली, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. (Fire breaks out in LIC office building in Santacruz area in Mumbai this morning)

एलआयसी कार्यालयाच्या (LIC Office, Santacruz) दुसऱ्या मजल्यावरील सॅलरी सेव्हिंग स्कीम विभागात ही आग लागली. कार्यालयामधील इलेक्ट्रिक वायरिंग, इन्स्टॉलेशन, कॉम्प्युटर, फाईल रेकॉर्ड, लाकडी फर्निचर इत्यादींना आग लागल्याने मोठं नुकसान झालंय. याठिकाणी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवली जात असल्याची माहिची मुंबई (Mumbai) अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.