डोंबिवली स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग...(पहा व्हिडिओ)
डोंबिवली स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग...(पहा व्हिडिओ)Saam Tv

डोंबिवली स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग...(पहा व्हिडिओ)

डोंबिवली रेल्वे स्टेशन जवळ लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवली : डोंबिवली Dombivli रेल्वे स्टेशन जवळ लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग Fire लागल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका गोदामाला आग लागली आहे. या आगीचा धूर परिसरात लांबपर्यंत पसरले आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. Fire broke building Dombivli station

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जोमाने सुरु आहे. डोंबिवली पूर्वेत रेल्वे स्थानकाजवळ लक्ष्मी निवास नावाची ३ मजली इमारत आहे. या इमारती मध्ये काही रहिवासी राहतात. स्थानकाजवळचा परिसर असल्याने, या भागात अनेक कमर्शिअल ऑफिस आहेत. लक्ष्मी निवास इमारती मध्ये देखील काही कमर्शिअल ऑफिस आहेत.

पहा व्हिडिओ-

इमारतीच्या २ मजल्यावर लाकडाचे गोदाम आहे. या गोदामातच ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित घटना दुपारी ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीमागील नेमके कारण अद्याप अजून देखील समजू शकले नाही. तसेच आगीत काही जिवितहानी झालेली आहे का याबद्दलची माहिती देखील समजू शकलेली नाही. Fire broke building Dombivli station

डोंबिवली स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग...(पहा व्हिडिओ)
दिल्लीतील CBI मुख्यालयाला भीषण आग

पण आगीमुळे गोदाम जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल करण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता, आणखी काही गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्मिशमन दलाच्या जवानांनी जोमाने प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. जवळपास तासाभराच्या अगोदरच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. इमारतीत काही रहिवासी राहत असल्यामुळे अनेकांना धडकी देखील भरली होती. मात्र, सुदैवाने ही मोठी दुर्घटना टळली आहे. या आगीत गोदामामधील लाकडे पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com