
मुंबई: मुंबईच्या परळ परिसरात महानगर गॅस लिमिटेडच्या (Mahanagar Gas Limited) पाइपलाइनला आग (Fire) लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी १ अग्निशमन बंब आणण्यात आले आणि आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, याठिकाणी अजूनही गॅस गळती सुरू आहे. याची खबरदारी म्हणून आजूबाजूची दुकानं बंद करण्यात आली आहेत. (Parel Fire News)
हे देखील पाहा -
या परिसराच्या पेट्रोल पंपालगतच ही पाइपलाइन आहे. गॅसच्या गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या ही गॅसगळती बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच सावधगिरीचे पाऊल म्हणून हा परिसर खाली केला जात आहे, आणि दुकांनांनाही बंद करण्यात आले आहे. हिंदमाता येथील पेट्रोलपंप समोर महानगर गॅस लिमिटेडची अडरग्राऊड गॅस पाइपलाइन आहे. याठिकाणी जमिनीखालून अचानक आगीच्या ज्वाला येऊ लागल्या त्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशनम दलाच्या तत्परतेमुळे मोठा धोका टळला आहे.
या परिसरातील वीजपुरवठा प्रशासनाने बंद केला आहे, तसेच या गॅस पाइपलाइनचा गॅस पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. मदत कार्यात कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून पोलिस प्रशासनही या ठिकाणी दाखल झाले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.