Breaking : ठाण्यात आगडोंब! LPG गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी

Breaking : ठाण्यात आगडोंब! LPG गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी
Fire incident at thanesaam tv

ठाणे : वागळे इस्टेटमधील अंबिका नगर येथील सिलिकॉ सायंटिफिक या प्रयोग शाळेतील सामान तयार करण्याच्या कंपनीमध्ये भीषण आग (Fire incident) लागली आहे. या कंपनीत एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आगीच्या धुराचे प्रचंड लोळ हवेत पसरत आहेत. ही आगीची घटना आज शनिवारी १० वाजून ९ मिनिटांच्या सुमारास घडली. वागळे इस्टेटच्या (Wagle Estate) अंबिका नगर २ या ठिकाणच्या रोड नंबर २९ मध्ये प्लॉट नंबर ए-२०२ सिलिका सायंटिफिक कंपनीमध्ये आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या ६ गाड्या (Fire brigade) घटनास्थळी पहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Fire incident at thane
राणे कुटुंबीयांनी कातडी वाचवण्यासाठी भाजपची लाचारी सुरू केली : विनायक राऊत

आगीच्या घटनेची माहिती मिळताच महावितरण कर्मचारी,वागळे इस्टेट पोलीस कर्मचारी,आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी २, फायर वाहन, १- रेस्क्यू वाहन, २ वॉटर टँकर घटनास्थळी पोहोचले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसंच अंबिकानगर येथील ठाकूर इंडस्ट्रीजमध्ये लागलेल्या या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Edited by - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com