Vasai: वसईच्या समुद्रात आगसदृश्य प्रकार; नागरिकांमध्ये घबराट

अरबी समुद्रात अचानक दिसले आगीचे लोळ
Vasai Virar
Vasai VirarSaam Tv

मुंबई - वसई विरारच्या (Vasai Virar) तसेच पालघर (Palgahr) मधिलसर्वच समुद्र किनाऱ्यावरून खोल समुद्रात आग लागल्याचे दिसून येत आहे. खोल समुद्रात अचानक हे आगीचे लोळ दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

मात्र, या संदर्भात विरार अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले १५ नोटिकल खोल समुद्रात ongc ऑइल रीघ चे काम चालू आहे. त्यालमुळे आगीचे लोळ दिसून येत आहेत. या मध्ये कोणतेही घाबरण्याचे कारण नाही असे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू जाऊ नये असे या वेळी सांगण्यात येत आहे.

हे देखील पाहा -

नक्की काय झालं?

वसई विरारच्या समुद्रात आगसदृष काही तर दिसल्याचे समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या निदर्शनास आले. हा सर्व भयानक प्रकार रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. या आगिमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

Vasai Virar
Petrol Diesel: गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करताय? मग आधी पेट्रोल-डिझेलचे दर तपासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com