Fire Cracker: म्हाडाच्या इमारतीत फटाक्यांची निर्मीती; स्फाेटात दाेघे जखमी

या घटनेची पाेलिस चाैकशी सुरु आहे.
Fire Cracker burst in Mumbai
Fire Cracker burst in Mumbaisaam tv

मुंबई : गौतम नगर येथे पंचशील सोसायटीमधील म्हाडाच्या इमारतीत फटाक्यांचा (fire cracker) स्फोट झाल्याने दोन जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत. या भागात (mumbai) अवैधरित्या फटाके बनविण्याचा उद्याेग केला जात असल्याची माहिती मिळाली आहे. (mumbai latest marathi news)

गौतम नगर येथे पंचशील सोसायटी म्हाडाच्या इमारतीमध्ये अवैद्य पद्धतीने फटाके बनवण्याचं काम गेल्या काही वर्षंपासून सुरू आहे. मात्र याची कोणालाही माहिती नव्हती. गुरुवारी फटाके बनवत असताना अचानक स्फोट झाल्याने ही बाब उघडीकस आली. आहे.

Fire Cracker burst in Mumbai
Holi Festival: फुग्यानं केला घात? दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार ठार, पाेलिस चाैकशी सुरु

या स्फाेटात गंगुबाई बायडे (वय ७०) आणि त्यांचा मुलगा योगेन्द्र (वय ५०) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा स्फाेट झाल्याने शेजारील घराच्या खिडकीच्या काचांना तडा गेल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली.

Fire Cracker burst in Mumbai
बॅंक शाखा अधिकाऱ्याचा शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा...

त्यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन दल, पोलीस, बीएमसी (bmc) कर्मचारी, अतिक्रमण हटाव विभागाच्या वाहनांना बाेलाविण्यात आले. फटाकाच्या सुमारे तीन पिशव्या आणि कच्चा मालाच्या तीन ते चार पोती जप्त करण्यात आल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com