Raj Thackeray : ठाण्यातील 'उत्तर'सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

नौपाडा पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसंच मनसे नेते अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV

ठाणे: ठाण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल, मंगळवारी 'उत्तर'सभा झाली. या सभेत मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार करताना तलवार भेट दिली होती. या सभेत तलवार दाखवणं आता अंगलट आलं आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसंच मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तरसभेच्या दरम्यान त्यांचा मनसे नेत्यांनी तलवार देत सत्कार केला होता आणि हा सत्कार करुन झाल्यावर राज यांनी ही तलवार सभेला दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर आता गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यात (Naupada Police Station) आर्म्स कायद्यन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवल्या प्रकरणीचा हा गुन्हा आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, कालच्या सभेत स्वत: राज ठाकरे यांनी आपल्यावरती आधीच अनेक केसेस आहेत आणखी एकदोन केसेस पडल्या तर काही फरक पडत नसल्याचं म्हणाले होते.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com