आधी १४ गावांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा...

१४ गावातील ग्रामस्थांचा ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध कायम...
आधी १४ गावांना नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करा...
आधी १४ गावांना नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करा...SaamTvNews

दिवा :  आधी १४ गावांना नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करा, मगच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा विचारू करू अशी भूमिका १४ गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट १४ गावातील नागरिकांनी घेतली होती. त्यानंतर काल भंडार्ली गावात ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर उपस्थित होते. यावेळी मनसे आमदार पाटील यांनी पालकमंत्री यांच्यावर टीका आहे. तर आम्हाला आश्वासन नको आहे, सरकारने जीआर काढून १४ गावे नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करावीत असे शिवसेनेचे माजी आमदार भोईर यांनी सांगितले.

हे देखील पाहा :

भंडार्ली येथील खासगी जागेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा तात्पुरत्या स्वरूपात राबविण्यात येणार असून तो त्याठिकाणी कायमस्वरूपी नसेल, अशी ग्वाही देत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीला या तात्पुरत्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, १४ गावातील समस्या सोडवण्याची ग्वाहीही दिली.भंडार्ली येथे प्रस्तावित असलेल्या या घनकचरा प्रकल्पाला १४ गाव संघर्ष समितीने विरोध केला होता. ठाणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट आपल्या विभागात नको, अशी भूमिका घेऊन त्यांनी या प्रकल्पाचे काम त्वरित थांबवण्याची मागणी केली होती.

आधी १४ गावांना नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करा...
वकिलाच्या BMW गाडीला भीषण अपघात; चित्रपटातील दृश्यांप्रमाणे कारच्या कोलांट्या!

या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची समजूत घालण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची एक विशेष बैठक आयोजित केली होती त्यानंतर काल भंडार्ली गावात ग्रामस्थांची बैठक घेतली आणि आधी १४ गावांना नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करा, मगच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा विचारू अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यावेळी मनसेचे आमदार प्रमोद (राजू ) पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, ठाणे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, कल्याण पंचायत समितीचे उप सभापती भरत भोईर, सर्व पक्षीय विकास समितीचे लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील, विजय पाटील यांसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

आधी १४ गावांना नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करा...
Pune : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार यांच्यात टोळीयुद्धाचा भडका!

दरम्यान, याबाबत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले की, आम्हाला आश्वासन नको आहे. सरकारने त्वरित जीआर काढून १४ गावे नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करावीत. तर याबाबत मनसे आमदार यांनी सांगितले की, यांनी आमची २७ गावे काढू बोलले आणि १८ गावे काढली. दिव्याच्या डम्पिंग प्रश्नी २०१० साली अभिजित पानसे आंदोलना बसले होते. तत्कालीन आयुक्त सहा महिन्यात डम्पिंग हटवू बोलले होते, ते अद्याप देखील सुरु आहे. त्यामुळे यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा. आधीचे पालकमंत्री बोलल्याप्रमाणे करायचे. परंतु आताचे पालकमंत्री नव्हे तर ते बालकमंत्री झालेले आहेत. एक बालहट्ट पुरवण्यासाठी ते काम करत आहेत. १४ गावे काढणार म्हणजे भीक देत आहात का तुम्ही? ठाण्याचा कचरा ठाण्यातच राहूदेत अस मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com