BMC: कोळीवाड्यातील मतदार एक राहू नये म्हणून जाणीवपूर्वक वेगळ्या प्रभागांमध्ये विभागणी, मच्छीमार संघटनांचा आरोप

प्रभाग रचनेत एक कोळीवाडा दोन दोन प्रभागात विभागला गेला.
BMC: कोळीवाड्यातील मतदार एक राहू नये म्हणून जाणीवपूर्वक वेगळ्या प्रभागांमध्ये विभागणी, मच्छीमार संघटनांचा आरोप
BMC Saam Tv

मुंबई: मुंबईतील प्रभाग रचना राजकीय हेतूने केली गेली. प्रभाग फेररचना करतांना कोळीवाड्यांतील मतदार एक राहू नये यासाठी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आल्याचा दावा मच्छीमार संघटनांनी केला आहे (Fishermen's Association Says Koliwada Is Consciously Divided Into Separate Wards In BMC Ward Restructuring).

BMC
Mumbai : वॉर्ड पुनर्रचना आयोगानुसार मुंबईत 227 ऐवजी आता 236 प्रभाग !;पाहा व्हिडीओ

प्रभाग रचनेत (Ward Restructuring) एक कोळीवाडा दोन दोन प्रभागात विभागला गेला. कोळी बांधवांचे (Koli People) सदस्य निवडून येऊ नयेत यासाठी हा कट रचला गेला, असा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केला आहे. आता नव्याने वाढलेल्या प्रभागांमुळे कोळी वाड्याचे विभाजन झाले आहे. दरम्यान, यासाठी हरकती, सूचना घेण्याची तयारी ही कोळीबांधवांनी केली आहे.

BMC
शिवसेनेने मनानुसार प्रभागरचना केल्याचा भाजपचा आरोप; प्रभागरचने विरोधात BJP कोर्टात जाणार

2012 पासून मुंबई महापालिकेत (BMC) झालेल्या प्रभाग रचनेत पुढील कोळीवाडे (Koliwada) यांचे प्रभाग विभाजन झाले. प्रभाग पुर्नरचनेत अनेक प्रभागांप्रमाणे मुंबईत 63 गावठाणे आणि 31 कोळीवाड्यांचे दोन ते तीन प्रभागांमध्ये विभाजन झाले आहे.

वरळी (Worli) कोळीवाडा - वॉर्ड क्रमांक 199, 200 आणि 201

खार दांडा - वॉर्ड क्रमांक 102, 103

गोराई - वॉर्ड क्रमंक 10, 16, 17

ट्रॉम्बे - 149, 152

नवघर कोळीवाडा - 108, 109

जुने मुलुंड - 107, 110

देवनार - 145, 146, 147

माझगाव - 217, 218

माहीम - 188, 196

चारकोप - 19, 20

जुहू - 70, 71

कुलाबा (कफपरेड) - 234, 235

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com