Online मासे विकणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीमुळे मच्छीमारांची बदनामी

ऑनलाइन मासे (Fish) विक्री (Sales) करणाऱ्या एका कंपनीच्या जाहिरातीतून (Advertisment) मच्छी विक्रेत्या व्यवसायिक महिलांची बदनामी होत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे.
Online मासे विकणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीमुळे मच्छीमारांची बदनामी
Online मासे विकणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीमुळे मच्छीमारांची बदनामी

ऑनलाइन मासे (Fish) विक्री (Sales) करणाऱ्या एका कंपनीच्या जाहिरातीतून (Advertisment) मच्छी विक्रेत्या व्यवसायिक महिलांची बदनामी होत असल्याचा आरोप करत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने या कंपनीला नोटीस बजावली. या कंपनीच्या जाहिरातीवर मच्छिमारांनी आक्षेप घेतला आहे.अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती (Akhil Maharashtraa Macchimar kruti samiti) अध्यक्ष देवेंद्र तांडेल (Devendra Tandel) यांनी याबाबत मच्छीमांराच्या वतीने भुमिका स्पष्ट केली आहे.

हे देखील पहा-

'बाजारवाली मच्छीके साथ बदबू फ्री' असं म्हणत एका ऑनलाइन मच्छी विक्री करणाऱ्या कंपनीने जाहिरात तयार केली. ही जाहिरात समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर या जाहिरातीमुळे कोळी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या जाहिरातीमुळे मासेविक्रेत्यांची बदनामी होत असल्याचा आरोप कोळी बांधवांनी केला आहे. बाजारातील माशांना वास येत असून आपल्याकडील मासळीला दुर्गंधी नसल्याचा दावा या जाहिरातीतून केला आहे. याला मच्छिमार संघटनेने हरकत घेत ही जाहिरात दाखवणे बंद करा, असे स्पष्ट करत कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Online मासे विकणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीमुळे मच्छीमारांची बदनामी
बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने इतिहास रचला, भारतास 5 वे सुवर्णपदक

मासेमारी आणि विक्री हा कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय असून आजपर्यंत मासळी बाजारात विकली जात असताना त्याचा कधी वास आला नाही. ऑनलाइन मासे विक्री करणाऱ्या कंपन्या सुरू झाल्यापासून बाजारातील मासळीला ठरवून बदनाम केले जात असल्याचं मच्छिमारांचं म्हणणं आहे.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com