डोंबिवलीत खदानीत बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

डोंबिवली जवळ असलेल्या संदप गावातील (village) खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील (family) ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली
डोंबिवलीत खदानीत बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
Dombivli Saam Tv

ठाणे : डोंबिवली जवळ असलेल्या संदप गावातील (village) खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील (family) ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संदप गावाबरोबरच आसपासच्या देसले पाडा, भोपर आदी परिसरामध्ये पाणी टंचाई आहे. यामुळे या भागात नागरिक संदप गावातील खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात.

हे देखील पाहा-

काल सायंकाळच्या ६ वाजल्याच्या सुमारास देसले पाडा येथील गायकवाड कुटुंबातील २ महिला व ३ मुले या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ५ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

Dombivli
ताजिंदर बग्गा यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा

मानपाडा पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून हे मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात (Hospital) शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले होते. अपेक्षा गायकवाड (वय-३०), मीरा गायकवाड (वय-५५), मयुरेश गायकवाड (वय-१५), मोक्ष गायकवाड (वय-१३) निलेश गायकवाड (वय-१५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.