ठाणे हादरले! अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

पाण्यानें भरलेल्या प्लास्टीकच्या टाकीमध्ये (बॅरल) बुडवून ५ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली
ठाणे हादरले! अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या
ठाणे हादरले! अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्याSaamTV

ठाणे : पाण्यानें भरलेल्या प्लास्टीकच्या टाकीमध्ये (बॅरल) बुडवून ५ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या केल्याची संतापजनक घटना शनिवारी समोर आली आहे. कळवा साईबानगर झोपडपट्टी मधील एका घरातून शुक्रवारी हा मुलगा बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कळवा (kalwa) येथील साईबानगर येथील झोपडपट्टीमध्ये शंकर आणि शांती चव्हाण हे दाम्पत्य राहत आहे. त्यांना ४ वर्षांचा एक मुलगा आणि ५ वर्षांच्या एका मुलीसह हा ५ महिन्यांचा मुलगा होता. शंकर हा बिगारीचे काम करून घराचा उदरनिर्वाह करत होता. त्यामध्ये २४ डिसेंबर २०२१ दिवशी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास घरात हा ५ महिन्याचा मुलगा झोपला होता.

हे देखील पहा-

या दरम्यान त्याची आई शेजारी गेली असतानाच कुणीतरी अज्ञाताने त्याला घरातून (home) उचले आणि बाहेरच असलेल्या एका पाण्याने भरलेल्या टाकीमध्ये (Tank) टाकून दिले आणि त्यावर झाकण लावले. यामुळे त्या लहान बालकाचा मृत्यू (deceased) झाला. दरम्यान, मुलगा बेपत्ता झाल्याने शंकर आणि त्याच्या पत्नीने कळवा पोलीस (Police) ठाण्यात मुलाच्या अपहरणाची (Abduction) तक्रार दिली होती. पोलीस त्याचा शोध घेते असतानाच त्याच्या हत्येचा हा प्रकार समोर आला आहे.

ठाणे हादरले! अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुकल्याची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या
हिवाळी अधिवेशनास उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह

या घटनेमुळे संपूर्ण ठाणे (Thane) शहरात खळबळ उडाली असून ही हत्या कोणी केली याचा शोध कळवा पोलीस घेत आहेत. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे आणि कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड आदी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यामधील आरोपीना लवकरच अटक करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त अंबुरे यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com