Dombivali Breaking : डोंबिवलीजवळ खदानीत पडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू!

परिसरात पाणी नसल्याने कपडे धुण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
Dombivali Breaking : डोंबिवलीजवळ खदानीत पडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू!
Dombivali sandap village minesaam tv

डोंबिवली : डोंबिवलीजवळ संदप गावातील (Sandap village) खदानीत तलावात बुडून (Mine) एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने (five people death) खळबळ माजली आहे. मृतांमध्ये २ महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. परिसरात पाणी नसल्याने कपडे धुण्यासाठी गेलेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. संदप गावात ही धक्कादायक घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिसले गावचे सरपंच आणि पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांची आई, सून आणि तीन नातवंडं दुपारच्या वेळेस कपडे धुण्यासाठी तलावात गेले होते. तलावात काही लोकं बुडाल्याची माहिती साडेसहाच्या सुमारास पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर घटनेची खात्री करुन पाच मृतदेह फायर ब्रिगेडच्या मदतीनं बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कुणीतरी एक जण त्या तलावात बुडाला असावा आणि त्याला वाचविण्यासाठी गेलेले इतर लोकं तलावात बुडाले असावेत. अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आलीय.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.