Pune News: पुण्यातील हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल आजपासून तीन दिवस बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन

पुणे ते सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या बाजूची उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
Pune
PuneSaam Tv

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपूल आजपासून तून दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. १० फेब्रुवारी ते रविवार १२ फेब्रुवारीपर्यंत पुणे ते सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या बाजूची उड्डाणपुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सोलापूर पुणे वाहतूक सुरू राहणार आहे.

लोड टेस्ट करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Pune
Ajit Pawar: पोट निवडणुकीसाठी अजित पवार उतरले मैदानात, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या सुचना, म्हणाले; 'हलक्या कानाचे राहु नका...'

पुणे महानगरपालिका हद्दीतील पुणे सोलापूर महामार्गावर बांधण्यात आलेला हडपसर गांव ते गाडीतळ - जाणारा उड्डाणपुल धोकायदायक झाला असल्याने ५ फेब्रुवारी २०२२ पासून वाहतूकीसाठी संपूर्ण बंद करण्यात आला होता. पुलावरुन जाणारी संपुर्ण वाहतूक सर्व्हिस रोडवळून वळवण्यात आली होती. सदर पुलाची दुरुस्ती करण्यात आली असून सदरच्या पुलावर लोड टेस्ट करणेसाठी पुलावरुन जाणारी वाहतूक बंद करण्याबाबत पुणे महानगरपालिकेला कळवण्यात आलं आहे.

Pune
Pune Crime : कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध देऊन २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार; जबरदस्तीने लग्नही लावलं, पुण्यातील घटना

हडपसर वाहतूक विभागाअंतर्गत हडपसर उड्डाणपुलावरील पुणे ते सोलापूर व सासवडकडे जाणाऱ्या लेनवरुन जाणारी सर्व प्रकारची वाहतूक १० फेब्रुवारी १२ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात येणार आहे. सदर कालावधीत उड्डाणपुलावरुन सोलापूरकडून पुणेकडे व सासवडकडून पुणेकडे येणारी वाहतूक सुरु राहील. हडपसर उड्डाणपुलाच्या खालुन पुणे-सोलापूर रोड या पर्यायी मार्गाच वापर नागरिकांना करता येईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com