पार्सल घेवून आलेल्या डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचं चुंबन, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे.
Pune girl molested
Pune girl molestedsaam tv

सचिन जाधव

पुणे : येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. जेवणाचे पार्सल घेवून आलेल्या डिलिव्हरी बॉयने एका तरूणीचा विनयभंग (Girl Molested) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणाने १९ वर्षीय तरुणीचं चुंबन घेतल्याची घटना येवलेवाडी परिसरातील एका सोसायटीत शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलीय. रईस शेख (४०) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. (Food delivery boy molested a girl in pune)

Pune girl molested
काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर; राहुल गांधींना बिनविरोध पक्षाचं अध्यक्षपद देण्याला बड्या नेत्याचा विरोध

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी येवलेवाडी परिसरातील एका सोसायटीत राहते. शनिवारी रात्री पीडित तरुणीने एका अॅपवर ऑनलाईन ऑर्डर मागवली होती. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी रईस शेख पार्सल घेवून आला.

Pune girl molested
राजपत्रित अधिकारी महासंघाचं ‘लक्षवेध दिन’ आंदोलन घेतले मागे; मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं आवाहन

जेवणाचे पार्सल दिल्यानंतर आरोपी शेखने पीडित मुलीकडं पिण्याचे पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर आभार व्यक्त करणाच्या बहाण्याने शेखने पीडितेला चुंबन घेत हात पकडून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी शेखला बेड्या ठोकल्या.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com