Mumbai: उद्धव ठाकरेंच्या सेनेसाठी BMC म्हणजे कमाईचे साधन - सोमय्यांचे गंभीर आरोप

Mumbai: उद्धव ठाकरे यांच्या सेनेला पालिका म्हणजे कमाईचे साधन आहे असं सोमय्या आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
Mumbai: उद्धव ठाकरेंच्या सेनेसाठी BMC म्हणजे कमाईचे साधन - सोमय्यांचे गंभीर आरोप
kirit somaiya corruption allegations on shivsena in MumbaiSaam Tv

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मुंबई महानगर पालिका (BMC) म्हणजे कमाईचे साधन आहे अशा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर केला आहे. मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेत त्यांनी शिवसेनेवर (Shivsena) भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले आहेत. (For Uddhav Thackerays ShivSena BMC is a source of income Somaiyas serious allegations)

हे देखील पहा -

सोमय्या (Kirit Somaiya) आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेला पालिका (BMC) म्हणजे कमाईचे साधन आहे. कोविडमध्ये यांनी जी लूट केली त्याचे घोटाळे मी आता मांडणार आहे असं म्हणत आज मी पुराव्यासह 15 कोटी यशवंत जाधव यांनी कशापद्धतीने एजंटला दिले हे सांगत आहे अशी माहिती देत त्यांनी शिवसेना नेत्यावर आरोप केले. सोमय्या म्हणाले की, 15 कोटी तुकड्या-तुकड्यांनी दिले. प्रधान डीलर्स प्रायव्हेट लि. च्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले. 1 रूपयांचे शेअर यांनी 500 रुपयांनी घेतले. यशवंत जाधव यांच्या खात्यात 2 कोटी, यामिनी जाधव 2 कोटी, निखिल जाधव 50 लाख, यतीन जाधव 50 लाख, Shauru ट्रेडिंग कंपनीच्या खात्यात 3 कोटी रुपये, Cressida traders च्या खात्यात 2 कोटी, सुनंदा मोहिते यांच्या खात्यात 5 कोटी असे एकूण 15 कोटी यशवंत जाधव यांनी आपल्या आणि आपल्या नातेवाईक यांच्या खात्यात वळवले असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

kirit somaiya corruption allegations on shivsena in Mumbai
Dhule: विनामास्‍क दंडाची रक्‍कम वाढली; मग दंडापेक्षा मास्क फायद्याचा

पुढे सोमय्या म्हणाले की, आम्ही याबाबत सर्व एजन्सींना तक्रार करणार आहोत. कोविडच्या सर्व कंत्राटाची चौकशी झाली पाहिजे. मागील एक महिन्यांपासून मी माहिती अधिकाराखाली माहिती मिळवत आहे पण तिकडे सांगितले जात आहे की किरीट सोमय्या यांना माहिती देऊ नका असाही आरोप त्यांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.