इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन पडून विदेशी महिलेचा मृत्यू

मात्र हा अपघात आहे की घातपात याचा डी. एन नगर पोलीस तपास करत आहेत.
इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन पडून विदेशी महिलेचा मृत्यू
इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन पडून विदेशी महिलेचा मृत्यूSaam TV

मुंबई - अंधेरीत इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन पडून विदेशी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (24 नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली आहे. अहसेना दुबिणा असे या महिलेचे नाव असून ती मूळची उकरेन या देशाची नागरिक आहे.अहसेना ही दारुच्या नशेत पडल्याचे तिच्यासोबत असलेल्या मित्रांनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात याचा डी. एन नगर पोलीस तपास करत आहेत.

हे देखील पहा -

शवविच्छेदन अहवालानंतर काही गोष्टींचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. २२ नोव्हेंबरला अहसेना मुंबईत आली ती अंधेरीच्या मिलेनियम हॅरिटेज इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १२०२ मध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. मंगळवारी रात्री ती तिच्या मित्रांसोबत घरातच मद्यप्राशन केले होती. पहाटे अचानक अहसेना ही बाराव्या मजल्यावरुन खाली पडली होती.

या घटनेनंतर तिच्या दोन्ही मित्रांची पोलिसांनी चौकशी केली असता अहसेना ही रात्री उशिरपर्यंत मद्यप्राशन करत होती. ती खिडकीजवळ असताना तिचा तोल गेला आणि ती बाराव्या मजल्यावरुन खाली पडली असे सांगितले जात आहे.

इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन पडून विदेशी महिलेचा मृत्यू
राज्यातल्या ३२ जिल्ह्यातील नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर...

पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा करत असून या अहवालातून काही गोष्टींचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, उकरेन दूतावासास अहसेनाच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com