
निवृत्ती बाबर
Mumbai News : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. तसेच राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. या सर्व घटनाक्रमावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
उद्धव ठाकरे म्हणाले, 'राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना शिक्षा ठोठावली गेली'.
'लोकशाही चे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत राहुल गांधी यांना नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी हे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का? असं वक्तव्य केलं होतं. याच प्रकरणावरुन राहुल गांधी यांच्यावर गेल्या चार वर्षांपासून मानहानीचा खटला सुरू होता.
लोकसभा सचिवालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली. वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर ते लोकसभेच्या खासदारकीसाठी अपात्र ठरले आहेत.
ही अपात्रता त्याच्या दोषी ठरल्याच्या दिवसापासून म्हणजेच 23 मार्च 2023 पासून लागू होईल. राज्यघटनेच्या कलम 102 (1) (ई) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.