माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा तपास आता SIT कडे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा तपास आता SIT करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि त्यांच्या टोळीने अशी केली लूट
माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि त्यांच्या टोळीने अशी केली लूटSaam Tv

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param bir singh) यांचा तपास आता SIT करणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपायुक्तांच्या नेतृत्त्वाखाली SIT ची स्थापना करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्यासंबंधी सर्व प्रकरणांचा तपासणी आता विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

उपायुक्त दर्जाचे अधिकारी या SIT च्या टीमचे प्रमुख असून सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी एसआयटीचे प्रमुख तपास अधिकारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबईत दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह आणि त्यांच्या टोळीने अशी केली लूट
धक्कादायक! कोरोनाने पतीचा मृत्यू तर पत्नीने केली आत्महत्या

हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकारी व बडे व्यक्ती तसेच राजकरण्यांच्या संदर्भात आहे. त्यामुळे तपासावर त्याचा कसलाही परिणाम होऊ नये, तसेच विशिष्ठ वेळेत याप्रकरणांचा तपास होण्यासाठी या SIT ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ही एसआयटी थेट सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील तसेच मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना रिपोर्ट करणार असल्याची माहिती विश्वसनिय सूञांनी दिली आहे.

परबीर सिंग यांच्याविरोधातील पहिले प्रकरण दाखल झाले ते मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात. ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Bribery Prevention Department) परमबीर सिंह यांची खुली चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. पोलीस अधिकारी अनुप डांगे यांच्या तक्रारीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बुकी सोनू जालानच्या तक्रारीप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) तपास करत आहेत. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com