"मलमपट्टी करण्याच्या जागेवरच...", मोरेश्वर भोईर यांची महापालिकेवर सडकून टीका

Kalyan : देसलेपाडा येथील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली.
"मलमपट्टी करण्याच्या जागेवरच...", मोरेश्वर भोईर यांची महापालिकेवर सडकून टीका
Moreshwar BhoirSaam Tv

कल्याण ग्रामीण : 27 गावातील पाणी टंचाईमुळे देसलेपाडा येथील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या घटनेला 24 तास उलटत नाही तोच, दुसरीकडे कल्याण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि अधिकाऱ्यांचा नाच गाण्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ समोर येताच नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यावरून भाजपचे माजी नगरसेवक आणि उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी कल्याण महापालिकेवर सडकून टीका आहे. 'इथे जखमच महालिकेने केली आहे, मलमपट्टी करण्याच्या जागेवर महापालिका कुठेतरी मीठ चोळतेय, महापालिका प्रशासनाची जेवढी निंदा करता येईल तेवढी कमी आहे'. असं भोईर यांनी म्हटलं आहे.

Moreshwar Bhoir
बर्थडे पार्टीला गेलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर; कोल्ड्रिंक्समधून गुंगीचं औषध दिलं अन्...

मनसे आणि भाजप पाण्यासाठी मोर्चा काढला होता. यावेळी मनसे आमदार आणि भाजप आमदार यांनी केडीमसीच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. यावेळी केडीमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी पाण्याची उपाय योजना करू असे आश्वासन दिले होते. मात्र 27 गावांत पाण्याची टंचाई भेडसावतच आहे. त्यातच देसलेपाडा येथील एकाच कुटुंबातील 5 जणांचा खदाणीत बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पालिका अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेणं आवश्यक होते, मात्र तसे न करता अतिरिक्त आयुक्तांसह इतर पालिका अधिकारी नाच गाण्यात दंग असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

रविवारी सकाळी पोलीस प्रशासनाच्या वतीने हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त हे गाणी गाताना दिसत होते. तर इतर अधिकारी नाचताना दिसत होते. हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत असून यावरून नागरिक मात्र संताप व्यक्त करीत आहे. यावरून भाजपचे माजी नगरसेवक आणि उपमहापौर मोरेश्वर भोईर यांची पालिकेवर सडकून टीका आहे.

भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "या कृत्रिम पाणी टंचाईच्या विरोधात मागील महिन्यात मोर्चा काढला होता. 3 दिवसांपूर्वी दुर्दैवी घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापालिकेचा काही उपक्रम असेल, तरी परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन त्याप्रमाणे अनुकरण होणं अधिकाऱ्यांकडून होण अपेक्षित होतं. पूर्वी एक म्हण प्राचिलीत होती जखेमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असायचा परंतु इथे जखमच महालिकेने केली आहे. तसेच मलमपट्टी करण्याच्या जागेवर महापालिका कुठेतरी मीठ चोळतेय असं चित्र कुठेतरी दिसतयं. खरंतर या कृत्रिम पाणी टंचाईला महापालिकेने जर ठरवलं निश्चित मार्ग निघेल आणि लवकरात लवकर पाणी या भागात मिळेल. मागच्या मोर्चाच्या वेळेला त्यावेळी जी आश्वासने दिली, त्या पद्धतीने जर कृत्या घडल्या असत्या तर मला वाटत त्यादिवशीची घडलेली दुर्घटना टळली असती". असं म्हणत भोईर यांनी पालिकेवर सडकून टीका केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.