
भूषण शिंदे -
मुंबई : 'तुम्ही आम्हाला विचारता कि बाबरीच्या (Babari) वेळी आम्ही कुठे होतो, तर तुम्ही कुठे होता? रेकॉर्ड काढा आणि फोटो काढा मग कळेल कोण बाबरीच्या वेळी होतं ते, तुम्ही जेलमध्ये गेला सुद्धा असाल पण तुमच्या आसपास आम्ही होतो हे विसरु नका. अशा शब्दात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra FAdnavis) आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मुळात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) ला कधी कोणी विरोध केलेला नाही. मुस्लिम लोकांनी देखील विरोध केला नाही. मात्र, हनुमान चालीसा मागे जो भेसूर चेहरा आहे तो स्पष्ट होतोय. आधी भावावर टीका केली पण नंतर कळले कि भावावर टीका केली म्हणून बॅक फूटवर जावे लागते कि काय असं कळल्यावर काल फक्त पवार साहेबांवर बोलले. उद्धव ठाकरे (Uddhv Thackeray) मुख्यमंत्री झाले तेव्हा अनेकांनी टीका केली कि नवखा आहे, त्यांना जमणार नाही. पण त्यांनी करून दाखवले ज्याची दखल आज जगाने घेतली असल्याचंही ते म्हणाले.
बाबरी च्या वेळेला महिलांना परवानगी नव्हती. बाबरी पाडली तेव्हा सगळ्यांची पळता भुई थोडी झाली होती. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की होय शिवसैनिकांनी बाबरी पाडली. सत्तेसाठी कायपण करायचे असे कोण आहेत हे लोकांना कळलं आहेत. तुम्ही आम्हाला विचारता कि आम्ही कुठे होतो तर तुम्ही कुठे होतात, रेकॉर्ड काढा आणि फोटो काढा मग कळेल कोण बाबरीच्या वेळी होते. ते तुम्ही जेलमध्ये गेला सुद्धा असाल पण तुमच्या आसपास आम्ही होतो हे विसरु नका. तुम्ही असाल सुद्धा पण आम्ही नव्हतो हे बोलण चुकीचं आहे. मुन्नाभाई सारखे केमिकल लोचा झालंय त्यांचा असा टोलाही त्यांनी लगावला.
हे देखील पाहा -
तसंच तुम्ही दुप्पट आवाजात स्पीकर लावा आणि मी फिरून येतो, बिचारे कार्यकर्ते भोंगे वाजवत पण नंतर त्यांनाच भोगावे लागेल ते स्वतः भोगायला येणार नाहीत असी टीका देखील पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर केली. लोकांनी शांत राहावे त्यांनी फसू नये आपल्याकडे अशा गोष्टी घडाव्यात म्हणून प्रयत्न सुरु आहेत. पण तुम्हाला दंगे हवेत आणि शिवसैनिक असं होऊ देणार नाही. स्पीकर लावणाऱ्यांनी देखील विचार करावा आणि नंतर कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेऊन शिवसैनिक यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मुंबईकरांनी काळजी जरूर नये नागरिकांनी काळजी करू नये असही त्या यावेळी म्हणाल्या.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.