Dombivali News: अ‍ॅम्बुलन्स रस्त्यातच बंद पडली; शिवसेनेच्या माजी आमदाराचं उपचाराअभावी निधन

Suryakant Desai: आमदार सूर्यकांत देसाई यांचे शुक्रवारी डोंबिवलीत निधन झाले.
Suryakant Desai
Suryakant DesaiSaam TV

अभिजीत देशमुख

कल्याण : शिवसेनेचे परळ लालबाग विधानसभा मतदार संघातील माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे शुक्रवारी डोंबिवलीत निधन झाले. माजी आमदार देसाई हे १९९५ ते २००० या कालावधीत परळ-लालबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार होते. गेली 22 वर्ष देसाई हे डोंबिवली पश्चिमेकडील भागशाला मैदान येथील काशीकुंज सोसायटी जयेश स्मृती येथे राहत होते.

कालपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. देसाई यांच्यावर डोंबिवली पूर्वेकडील कारवा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्रास वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती, मात्र व्हेंटिलेटर नसल्याने कारवा रुग्णलयाने देसाई यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास कुटुंबियांना सांगितले.  (Latest Marathi News)

Suryakant Desai
Kalyan News : उल्हासनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला भररस्त्यात मारहाण; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

कुटुंबियांनी साई पूजा रुग्णवाहिका संस्थेला फोन करून रुग्णवाहिकेला पाचरण केले. मात्र देसाई यांना घेऊन जात असताना कारवा रुग्णालयासमोर रुग्णवाहिका बंद पडली. रुग्णवाहिका बंद पडल्याने देसाई यांना रुग्णवाहिकेतून ममता हॉस्पिटलमध्ये नेत असताना रुग्णवाहिका ढकल्याची वेळ कुटुंबियांवर आली होती.

Suryakant Desai
Tamilnadu News: घशात ब्रेड अडकल्याने 21 वर्षीय बॉडी बिल्डरचा मृत्यू; चॅम्पियन होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं

शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील कारवा हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. कुटुंबियांना कारवा हॉस्पिटल ते मंजुनाथ शाळेपर्यंत रुग्णवाहिका ढकलावी लागली. नादुरुस्त रुग्णवाहिका बंद पडल्याने, उशिरा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याने देसाई यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. देसाई यांचा मुलगा ऋषिकेश याने साई पूजा रुग्णवाहिका विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com