अलिबाग हादरलं! कॉटेजमध्ये आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह

मुलांना विष देऊन त्यांची हत्या केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Crime news
Crime newsSaam tv

अलिबाग: अलिबागमध्ये फिरायला आलेल्या दाम्पत्यानं दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Family ends life) घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं अलिबाग (Alibag) हादरलं आहे. अलिबाग शहरातील एका कॉटेजमध्ये हे दाम्पत्य आणि त्यांची मुलं थांबली होती. हे सर्व कळंबोली येथील रहिवासी होते.

Crime news
भारतानं पुन्हा पाकिस्तानचे कान पिळले; जम्मू-काश्मीर राग आळवल्यानं फटकारलं

११ मे रोजीपासून ते अलिबागमध्ये राहत होते. आज सकाळपासून खोलीचा दरवाजा उघडला गेला नाही. तसंच आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आज दुपारी तीनच्या सुमारास मालकानं खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी सर्वांचे मृतदेह आढळून आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

अलिबाग शहरातील एका कॉटेजमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह कॉटेजमध्ये आढळून आले. दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मागील आठवड्यातच हे कुटुंब कळंबोली येथून अलिबागमध्ये फिरायला आल्याची माहिती समजते. अलिबागमध्ये फिरायला आल्यानंतर हे कुटुंब येथील एका कॉटेजमध्ये थांबलं होतं. आज दुपारी दोन्ही मुलांसह चौघांचे मृतदेह आढळून आले. दोन मुलांना विष देऊन त्यांच्या हत्येनंतर दाम्पत्यानंही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. अजून या घटनेचा तपास व्हायचा आहे. दोन मुलांची हत्या करून दाम्पत्यानं स्वतःही आत्महत्या केली. दाम्पत्यानं हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण समजू शकलेलं नाही.

सकाळपासूनच खोली बंद

ज्या कॉटेजमध्ये हे कुटुंब थांबलं होतं, ते कुटुंब सकाळपासून बाहेर पडलेलं दिसलं नाही. कुटुंबापैकी कुणीच बाहेर न दिसल्यानं, तसंच कोणतीही हालचाल दिसून आली नाही. अखेर दुपारी तीन वाजताच्या सुमारास मालकानं दरवाजा उघडून आतमध्ये बघितलं असता, चौघांचेही मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात नेले. या घटनेचा तपास सुरू आहे. मुलांची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल या दाम्पत्यानं का उचललं, यामागचं कारण अद्याप समोर आलेले नाही. कौटुंबिक वाद किंवा आर्थिक विवंचनेतून या दाम्पत्यानं हे पाऊल उचललं का, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, या घटनेची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com