Pune Crime News: हवेत गोळीबाराची आणखीन एक घटना; दहशत परवण्यासाठी तमा न बाळगता गोळीबार

परिसरात सर्वत्र आपली दहशत असावी, लोकांनी आपल्याला घाबरून रहावे या उद्देशाने त्यांनी गोळीबार केला.
Pune Crime News
Pune Crime Newsसचिन अग्रवाल, पुणे

सचिन अग्रवाल

Pune Crime News: पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आपण भाई आहोत आणि परिसरात आपली दहशत असावी या उद्देशाने पुण्यातील लोहगाव येथे हवेत गोळीबार करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. चार अज्ञात तरुणांनी हा गोळीबार केला. सध्या हे चौघे पेलिसांच्या ताब्यात आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथे शुक्रवारी एका टोळक्याने हवेत गोळीबार केला. दारूच्या नशेत त्यांनी हा गोळीबार केला. परिसरात सर्वत्र आपली दहशत असावी, लोकांनी आपल्याला घाबरून रहावे या उद्देशाने त्यांनी गोळीबार केला. सदर घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाले आहेत.

नितीन किसन सकट (वय.21), गणेश सखाराम राखपसरे (वय.21), पवन युवराज पैठणकर (वय.18,राहणार सर्व राखपसरे वस्ती लोहगाव), अविनाश काळुराम मदगे (वय.22,रा.खेसे वस्ती) यांनी हा गोळीबार केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. अशात विमातळ पोलिसांनी या टोळक्याला ६ तासांच्या अटक केली आहे. तसेत त्यांच्या विरुद्ध दहशत पसरवणे आणि आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News
Pune Half Marathon: ...असा इव्हेंट होतो तेव्हा अधिक लोकं धावतात! पुणे हाल्फ मॅरेथॉनचं चंद्रकात पाटील यांच्याकडून कौतुक

सीसीटीव्हीत दिसत असलेल्या दृश्यांनुसार हे चौघे एकाच दुचाकीवर (Bike) बसले होते. परिसरात आल्यावर त्यातील एकाने हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच कोरेगाव पार्कमध्ये अशीच घटना घडली होती. यात दोन गटात वाद असल्याने भर रत्यात हवेत गोळीबार करण्यात आला होता. तसेच एका टोळक्याने तरुणाला लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा लोहगावात अशी घटना घडली आहे.

Pune Crime News
Pune : गुलाबी थंडीत पुणे हाफ मॅरेथॉनला सुरुवात ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिसांनी या चारही जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच गोळीबार करताना वापरलेले पिस्तूलही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेमुळे परिसरातील नागरिक अस्वस्थ आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com