Vedanta foxconn | वेदांताने मुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेले पत्र सामच्या हाती; कंपनीला दिलं होतं 'हे' आश्वासन

Vedanta foxconn Politics News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांत कंपनीला २६ जुलैला लिहीलेलं एक पत्र आता सामटीव्हीच्या हाती लागलं आहे.
Vedanta-Foxconn Project
Vedanta-Foxconn ProjectSaam Tv

मुंबई: 'वेदांता' प्रकल्प गुजरातला शिफ्ट करण्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याबाबत आता एक खळबळजनक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांत कंपनीला २६ जुलैला लिहीलेलं एक पत्र आता सामटीव्हीच्या हाती लागलं आहे. या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांत फॉक्सकॉन ग्रुपला मोठं आश्वासन दिलं होतं. तसेच कंपनीच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या. असं असूनही कंपनीने आपला प्रकल्प गुजरातला नेल्याचा या पत्रातून दिसत आहे. (Vedanta-Foxconn Project News)

Vedanta-Foxconn Project
Explainer: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या स्पर्धेत गुजरातने महाराष्ट्राला कसे मागे टाकले?

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांत फॉक्सकॉन या कंपनीला २६ जुलैला पत्र (Letter) लिहून त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. जुलै महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कंपनीला लिहीलेल्या पत्रात म्हटलं गेलं की, आम्ही या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा पाठिंबा मिळवणा आहोत. कंपनीने महाराष्ट्र सरकारला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी घेण्याचेही सुचवले होते. केंद्राची मंजूरी आणि राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी या कंपनीच्या दोन्ही मागण्या पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कंपनीला दिलं होतं.

तसेच उच्चाधिकार समितीकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाला होता. त्यामुळे २९ जुलैलै सामंजस्य करार करु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. मात्र, महाराष्ट्र सरकारने एवढी सगळी आश्वासनं देऊनही कंपनीने गुजरातची निवड केली. त्यामुळे वेदांत फॉक्सकॉन ग्रुपवर केंद्र सरकारचा दबाव होता का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Vedanta-Foxconn Project
Sanjay Raut : संजय राऊत यांना ईडीचा पुन्हा मोठा झटका, जामीन देण्यास दर्शवला विरोध

वेदांता फॉक्सकॉन प्रकरण नेमकं काय आहे?

फॉक्सकॉन आणि वेदांत या दोन्ही कंपन्या मिळून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करत आहेत. फॉक्सकॉन ही तायवानची कंपनी आहे. परंतु आता फॉक्सकॉन मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करत आहे, कारण तायवानचे चीनशी असलेले संबंध खराब झाल्यानंतर या कंपनीचं लक्ष भारतावर अधिक आहे.

सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन इकोसिस्टम सेट करण्यासाठी वेदांतने फॉक्सकॉनसोबत 60:40 संयुक्त उपक्रमाद्वारे भागीदारी केली आहे. फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी असेंब्ली युनिट्स तयार करण्यारी कंपनी ओळखले जाते. यामध्ये मोबाइल उपकरणांचा समावेश आहे, पण ते फक्त मोबाईलसाठी मर्यादित नाही. या प्रकरल्पाची उद्दीष्ट म्हणजे भारताला स्वावलंबी बनवणे हे आहे. राज्यात १ .५४ लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प प्रस्तावीत होता. या संदर्भात राज्य सरकारसोबत चर्चाही सुरू होत्या. मात्र अचानक हा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com