मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर्सवर फसवणुकीचा गुन्हा

मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत
मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर्सवर फसवणुकीचा गुन्हा
मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर्सवर फसवणुकीचा गुन्हाSaam Tv

मुंबई - मुंबईतील Mumbai प्रसिद्ध ज्वेलर्सवर फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे. प्रसिद्ध ज्वेलर्स त्रिभुवन दास भिमजी झव्हेरी Tribhuvan Das Bhimji Zaveri अँन्ड सन्स रिटेल प्रा. लि कंपनीच्या डायरेक्टरवर हा फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे. मुलुंडमधील Mulund भावी ज्वेलर्सचे हर्ष सुसानिया Harash Susaniya यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्रिभुवन दास भिमजी झव्हेरी अँन्ड सन्स रिटेल प्रा. लि कंपनीच्या डायरेक्टर हेमंत वज्रलाल झव्हेरी आणि गिरीश नायक यांच्याविरोधात हा फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे देखील पहा -

मुलुंडच्या भावी ज्वेलर्स मधून सोन्याचे दागिने बनवून घेत, त्यांच्या कामाचे ६.५७ कोटी रुपये न दिल्याचा आरोप हा त्रिभुवन दास भिमजी झव्हेरी अँन्ड सन्स रिटेल प्रा. लि कंपनीच्या डायरेक्टर हेमंत झव्हेरी आणि गिरीश नायक यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com